फॅशन जगातला 'लेझर प्रिंट पॅटर्न'

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

सध्या अशाच एका कटची मार्केटमध्ये चांगलीच धूम आहे. लेझर कट प्रिंट हा प्रकार आजकाल सर्वत्र पाहायला मिळतोय.

फॅशन जगात वेगवेगळ्या पॅटर्नबरोबर प्रसिद्ध आहेत ते म्हणजे वेगवेगळे कट्‌स. मग ते लाँग गाऊन्सला असलेले स्ल्टि कट्‌स असो किंवा टॉप्सना असलेले साइड कट्‌स. एकूण पेहरावाला अधिक उठावदार बनवायला हे आकर्षक कट्‌स नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या अशाच एका कटची मार्केटमध्ये चांगलीच धूम आहे. लेझर कट प्रिंट हा प्रकार आजकाल सर्वत्र पाहायला मिळतोय.

लेझरच्या मदतीने कापड कापून अगदी कोरीव काम केल्यासारखे सुंदर डिझाईन कपड्यावर उमटवली जात असल्याने त्याला लेझर प्रिंटचे कपडे असे म्हटले जाते. या पेहरावाला कॉलेज युवती पसंती देत आहेत. क्रॉप टॉप्स, ऑफ शोल्डर टॉप्स, स्टिंग टॉप्स, लाँग गाऊन्स, मिडी ड्रेस, स्कर्ट, कुर्ती, टॉप्स, प्लाझो या सगळ्यांमध्ये लेझर कट प्रकार बाजारात दाखल झाले असून याकडे युवतींचा ओढा वाढला आहे. गळ्याभोवती, टॉपच्या खालच्या भागाला किंवा सिल्व्हरही लेझर प्रिंट कट पॅटर्न आकर्षक दिसत असल्याने याला जास्त पसंती मिळतेय. त्याचप्रमाणे बॅग, पर्स, ब्रेसलेट, हेअर बॅंड, ज्वेलरी, साड्यांमध्येही लेझर प्रिंटचा कट भाव खातोय.

फॅशनच्या जगात सर्वच तरुणाई एक पाऊल पुढे आहे. नव्याने बाजारात आलेल्या पेहराव खरेदी करण्यास कॉलेज युवती कधीच मागे नाहीत. लेझर प्रिंटचे कुर्ती, प्लाझो, टॉप्स तसेच त्यासोबतच्या वस्तूंकडे आकर्षित झालेली दिसून येतेय. त्यामुळे हा ट्रेंड वापरण्यासाठी अधिक पसंती देत आहेत. आपल्याकडे तो पेहराव कधी येईल आणि आपण कधी वापरणार यासाठी कायम तयार असतात.
- शुभांगी सूर्यवंशी, विद्यार्थी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News