घरातील लक्ष्मी म्हणजे माझी गाडी!

काजल डांगे
Thursday, 6 June 2019

मला गाड्यांचे प्रचंड वेड आहे. एखादी नवी कार जरी लाँच झाली तरी त्याबद्दल मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खरं तर नवनवीन गाड्यांच्या मॉडेल्सबाबत मला खोलवर अभ्यास करायला आवडतो. माझ्या एखाद्या मित्राला गाडी घ्यायची असेल तर तेही मला कोणती गाडी घेऊ? हे आवर्जून विचारतात. माझ्या बाबांकडे सुरुवातीपासूनच कार होती. पण स्वतःच्या कमाईतून मला कार घ्यायची होती. मला माझी स्वतःची कार घ्यायला जवळपास आठ ते नऊ वर्षे लागली.

२००१मध्ये मी काम करायला सुरुवात केली आणि २००९मध्ये मी माझी पहिली गाडी घेण्याचा निर्णय घेतला. ‘व्हॅगनार’ ही माझी पहिली कार होती. ही कार जवळपास मी पाच ते सहा वर्षे वापरली. माझी पहिली गाडी घेण्यामागचे कारण म्हणजे माझी पत्नी. २००५मध्ये माझे लग्न झाले. सुरुवातीला आम्ही बाईकवरून फिरायचो. पण नंतर तिच्या गरोदरपणाच्या काळात बाईकवरून रुग्णालयात जाणे किंवा फिरायला जाणे अशक्‍य झाले. तेव्हा आम्ही दोघांनी मिळून कार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बऱ्याच चांगल्या आठवणी या गाडीशी जोडल्या गेल्या आहेत.

माझ्या आयुष्यातील पडता काळ; तसेच चांगले क्षण या गाडीने पाहिले आहेत. व्हॅगनार म्हणजे माझ्या कुटुंबातील एक सदस्यच. आता माझ्याकडे स्कोडा रॅपिड ही कार आहे. जवळपास चार वर्षांपूर्वी ही नवी कार मी खरेदी केली. खरे तर दर पाच ते सहा वर्षांनी मला नवी गाडी खरेदी करायला फार आवडते. माझ्या कारला मी खूप जपतो. घरात मी वस्तू इकडे-तिकडे टाकतो. पण माझ्या गाडीमधील प्रत्येक वस्तू त्या-त्या जागी असते. गाडी स्वच्छ ठेवणे हा माझा छंद आहे. माझ्या घरातील लक्ष्मी म्हणजे माझी गाडी आहे. माझ्यासाठी कार ही निर्जीव नाही; तर सजीव वस्तू आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News