आजपासून महिला टी-२० वर्ल्डकपला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

सिडनी : महिला क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ टी-२० विश्‍वविजेपदासाठी आपली मोहीम उद्यापासून सुरू करत आहे आणि सलामीलाच त्यांच्यासमोर सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतालाही संभाव्य विजेत्या संघात स्थान दिले जात आहे.

या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ अगोदरच ऑस्ट्रेलियात दाखल झालेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या तिरंगी स्पर्धेत भारताने साखळीत या दोन्ही संघांना एकेकदा हरवले होते, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून थोडक्‍यात पराभव झाला होता. या स्पर्धेतील अनुभव भारतीय संघासाठी बहुमोल ठरणार आहे.

उपकर्णधार स्मृती मानधना, १६ वर्षीय हरहुन्नरी शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांच्यावर भारताची फलंदाजी आधारलेली आहे. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघात मधल्या फळीने सातत्य ठेवण्याची गरज आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News