महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूलाच का असतात? जाणून घ्या.. 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 January 2020
  • बाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. काही गोष्टी तर दंतकथेवर आधारित आहेत, ती काय आहेत, जाणून घेऊ 

आज महिला आणि पुरुष यांच्या फॅशनमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य निर्माण झाले आहे. अनेक महिला ऑफिसाठी देखील फॉर्मल्स वापरतात. मात्र महिलांच्या शर्टची बटणं ही पुरुषांच्या शर्टच्या बटणांच्या विरुद्ध म्हणजेच डाव्या बाजूला असतात. याबाबत खूप कमी जणांना माहिती असते. याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. काही गोष्टी तर दंतकथेवर आधारित आहेत, ती काय आहेत, जाणून घेऊ 

पूर्वीच्या काळी महिला आणि पुरुषांच्या पोशाखात मोठा फरक होता. महिला आणि पुरुषांच्या जबाबदाऱ्या देखील वेगवेगळ्या होत्या. पुरुषांना लढाई त्यासोबतच अनेक कष्टाची कामे करावी लागत. पुरुषांच्या डाव्या हातात शस्त्र असल्याने त्यांच्या शर्टाची बटणे उजव्या बाजूला होती.  त्यासोबतच महिलांना घरची कामे करावी आणि मुलांचे संगोपन करावे लागत असल्याने त्यांच्या उजव्या हाताचा सर्वाधिक वापर त्यात होत असे, त्यामुळे शर्टची बटणे डाव्या बाजूला होती. 

काही लोकांच्या माहितीनुसार, नेपोलियनने या गोष्टीची सुरुवात केली. त्यावेळी महिला आणि पुरुष यांची शर्टाची बटणे एकाच बाजूला असल्याने अनेक महिला टिंगल करत. त्यामुळे महिलांच्या पोशाखात भिन्नता दिसावी यासाठी महिलांच्या डाव्या बाजूला शर्टाची बटणे ठेवण्याचा आदेश दिला. 

काही जुन्या प्रथा आणि परंपरा या वर्षानुवर्षे चालत राहतात. काहींमध्ये पुरावे असतात काही नुसत्या आख्यायिका असतात. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीने त्याचा अर्थ लावत असतो. 

आज महिला आणि पुरुष यांच्या फॅशन आणि पोशाखात अनेक बदल झाले आहेत, त्यामुळे पुरुषांचे किंवा महिलांचे असा कोणता टॅग याठिकाणी राहिला नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News