कुशलच्या गाण्याची क्रेझ

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 25 February 2019

गायक कुशल छेडाने आजवर अभिजीत सावंत, भुवन बाम, अंतरा मित्रा यांसारख्या प्रसिद्ध मंडळींबरोबर काम केलंय. शिवाय त्याने लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये संगीतातील ३ पदव्या मिळवल्या आहेत.

संगीत क्षेत्रात अभ्यास केल्यानंतर कुशलने एक नवं पाऊल उचललं आहे. नुकतंच त्याने त्याचं पहिलं गाणं यू-ट्युबवर प्रदर्शित केलंय. ‘आजा बतला दू मैं’ असं या गाण्याचं नाव आहे.

विशेष म्हणजे हे गाणं टंग ट्‌विस्टर पद्धतीचं आहे. त्याच्या या गाण्याला यू-ट्युबवर लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. ‘संगीत आणि अभ्यास यावर माझं प्रचंड प्रेम आहे. संगीतावर असलेल्या प्रेमामुळेच मी हे गाणं करू शकलो’, असे कुशल म्हणतो.

कुशल तरुणांमध्ये ‘कुशलमंगल’ नावाने प्रसिद्ध आहे. संगीतातून इतरांपर्यंत निव्वळ आनंद देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आता तो आणखी कोणत्या नव्या प्रकारचं गाणं प्रदर्शित करणार, हे पाहणं रंजक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News