कोथळीगडच ‘हे’ आहे ऐतिहासिक रहस्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 March 2020
कोथळीगड हा भारताच्या महराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याशी गुहा मोठी आहे.

कोथळीगड हा भारताच्या महराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याशी गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्यामूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.

पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ‘कोथळ’ या नावानेही ओळखतात. कर्जतकडून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा आणि सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.

शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिबंक हा गडाचा किल्लेदार रसद आणि दारूगोळा, जवळील गावातून मिळवण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर आणि त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचं सैन्य कापून काढले.

हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफतह असेही नामकारण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रूपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने ही किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; ज्यात तो आणि त्याचे सैन्य मारले गेले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News