कोकण विभागीय महसूल स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

अलिबाग ः कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील आयपीसीएल क्रीडांगणात स्पर्धा रंगणार आहे. या वर्षी यजमानपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या सात जिल्ह्यांतील महसूल विभागांतर्गत क्रीडा स्पर्धा होणार आहेत. व्हॉलीबॉल, क्रिकेट,  फुटबॉल, खो-खो, जलद चालणे, लांबउडी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जलतरण, थ्रो बॉल, बुद्धिबळ, रिंग टेनिस, कबड्डी, टेबल टेनिस, शंभर मीटर, दोनशे मीटर, चारशे मीटर धावणे, शंभर मीटर, चारशे मीटर रिले, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, उंचउडी अशा अनेक प्रकारचे खेळ या तीन दिवसांत भरविले जाणार आहेत. 

महिला व पुरुष असे दोन गट असणार आहेत. स्पर्धेसाठी हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News