ही आहे शिवाजी महाराजांची कोल्हापुरातील शान..!

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 19 February 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यभर अनेक गड  किल्ले आहेत. कोल्हापुरातही अनेक गड आहेत. ज्यांची माहिती खूप कमी जणांना माहित आहे. जाणून घेऊ अशाच काही दुर्मिळ किल्ल्यांची माहिती. 

 

कलानिधीगड 
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस चंदगड तालुक्यातील आटोपशीर आकाराचा थोड्याशा सुस्थतीतील तट, बुरुज, देखणे प्रवेशदवर घनदाट जगलं व सोपी चढण असलेला आणि सहकुटूंब पाहता येण्यासारखा हा डोगरी किल्ला आहे. सभासद बखरीनुसार हा किल्ला शिवरायांनी  बांधला आहे. गडावरील उंचीने ठेंगणी व उतरती, पसरट छप्परे असलेली बैठी  दोन मंदिर वैशिट्यपूर्ण  आहेत.

 गगनगड / बावडा 
महाराष्ट्रचे 'चेरापुंजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गगनबावडा गावात गगनगड उभा आहे. दक्षिण कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्ग देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी  १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गेबीनाथांचे हे मूळ स्थान, १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रकाश झोतात आले. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे. गगनबावडा एस.टी. स्थानकातून गडावर चालत जाण्यास ३० मिनिटे लागतात. 
सूचना : गगनगडाचे दरवाजे रात्री ९:०० ते सकाळी ५:०० बंद असतात. 

भुदरगड 
हा अजूनही चांगल्या स्थितीत  असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्ष काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी  गडाची पुनबांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुदैवाने हा गड पुन्हा आदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला.  

 रांगणा किल्ला / प्रसिद्धगड 
 हा किल्ला ११ व्या शतकातला आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी बांधला आहे. किल्ले रांगणा उफ प्रसिद्धगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोगंरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागद्पत्रात, 'येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल' असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रागडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या १३ किल्ल्यामध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. गड पाहण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे ३ ते ४ तास लागतो. 

सामानगड 
हा गड शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस राखणदाराच्या रूपात किल्ले सामानगड उभा आहे.  विशाळगड, पन्हाळ, भुदरगड,रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठ्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे शिवकाळात महत्व फार आहे. कदाचित यावरून या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे. गड पाहण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे १.५ ते २ तास. 

महिपालगड 
प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचीन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रटिश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्याच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही. गडावर निवासाची व्यवस्था आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे. गड पाहण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात. 

अजिंक्य पारगड 
सह्याद्रीच्या  मुख्य महाराष्ट्रामध्ये  दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत स्वराज्यातील सर्वात दक्षिणे टोकला हा किल्ला येतो म्हणून याचे नाव पारगड ठेवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये पारगड हा किल्ला मोडतो. चंदनगड तालुक्याच्या गावापासून पारगडाचे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. किल्ल्यामध्येच पारगड नावाचे गाव वसवलेले आहे. पारगडापर्यत गाडी मार्ग असून चंदनगहून गडाच्या पायर्यांपर्यत एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते. सुमारे तीनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्यांबरोबर शिवकालीन पायऱ्याही आपल्याला आढळतात.  

पन्हाळा किल्ला /पन्हाळागड / पर्णलदुर्ग  
हा किल्ला ११७८ मध्ये बांधला आहे. प्रथम शिलाहार राजा भोज नसिह यांनी बांधला आहे. पन्हाळा हा कोल्हापूर भागातील, पन्हाळा तालुक्यातील महत्वाचा किल्ला आहे. पन्हाळाला पर्णलदुर्ग देखील म्हणतात. कोल्हापूरच्या वायव्यस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी निवास्थाने,हॉटेल्स आहेत. जेवणाची सोय निवास्थानामध्ये होते. कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो.   

पावनगड 
वाघबीळ गावापासून पन्हाळ्याकडे जाताना आपल्या डाव्या बाजूस सतत सोबत करणारा छोटेखानी किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळ्याचा जोडकिल्ला असला तरीही पावनगड दुर्लक्षित राहिलेला आहे. पन्हाळगडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्कडेय डोगराचा अडथळा पाहून शिवाजी महाराजानी १६७३ मध्ये हा डोगरच पन्हाळगडाचा एक घटक बनवण्यासाठी त्याची बांधणी सुरु केली. पावनगड या नावाने पन्हाळ्याला जोडूनच बुरुजासहन हा गड बांधला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी पावनगड बांधला. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News