पाहा कोल्हापूरच्या पावनगडाची ही अद्भूत दृष्य...

किरण मंगले
Monday, 13 May 2019

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकोट, किल्ले आहेत त्यापैकीच एक म्हणजे होय. वाघबीळ गावापासून पन्हाळ्याकडे जाताना आपल्या डाव्या बाजूस सतत सोबत करणारा छोटेखानी किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळ्याचा जोडकिल्ला असला, तरीही पावनगड दुर्लक्षित राहिलेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकोट, किल्ले आहेत त्यापैकीच एक म्हणजे होय. वाघबीळ गावापासून पन्हाळ्याकडे जाताना आपल्या डाव्या बाजूस सतत सोबत करणारा छोटेखानी किल्ला म्हणजे पावनगड. पन्हाळ्याचा जोडकिल्ला असला, तरीही पावनगड दुर्लक्षित राहिलेला आहे.पन्हाळगडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्कंडेय डोंगराचा अडथळा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये हा डोंगरच पन्हाळगडाचा एक घटक बनवण्यासाठी त्याची बांधणी सुरू केली.

कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ गावापासून पन्हाळय़ाकडे जाताना डाव्या बाजूस दिसणारा डोंगर म्हणजेच पावनगड. या वाघबीळ गावातून पावनगड डावीकडे ठेवतच गाडीरस्ता बुधवार पेठेतून पन्हाळगडावर जातो.

पन्हाळ्यावर पोचल्यावर स्थानिकांशी चर्चा केली आणि मग गाडी करूनच पुढं प्रस्थान केलं. (मागच्याच आठवड्यात इथे गवे दिसले आहेत, त्यात एक तर सकाळी बाजीप्रभूंच्या स्मारकापर्यंत आलेला असे अनेक लोकांनी सांगितल्यामुळे कसलीही तुफानी डोक्यात न आणता, स्थानिकांना सोबत घेऊन गेलेलं बरे!)

पावनगडावरील विहीर पाहिल्यावर आपल्याला चटकन कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगडावरील विहिरींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. जसे जसे विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली जायला लागू तस तसे वातावरणातला थंडपणा वाढायला लागतो. थोडे निरखून पाहीले असता विहिरीच्या आत एक दगडी कमान देखील खोदलेली दिसते. पुन्हा पायऱ्या चढून विहिरी बाहेर आले असता जवळच पाणी साठवण्याचे एक जुने दगडी भांडे ठेवलेले दिसते. 

बाजूलाच सुंदर बांधकाम केलेलं प्रशस्त शिवमंदिर आपल्याला दिसते. मंदिराच्या मागे एक छोटी घुमटी दिसते जी आहे पावनगडावरील घृतविहीर म्हणजे तुपाची विहीर. ही विहीर म्हणजे एक छोटा हौद असून त्यावर छत घातलेले दिसते. आज जरी त्यात पाणी व कचरा साठलेला दिसत असला तरी शिवकाळात बऱ्याच किल्ल्यांवर अश्या विहिरीत तूप साठवण्याची व्यवस्था केलेली होती. औषधे बनविण्यासाठी तसेच सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी या विहिरीमधील तूपाचा वापर होत असे.

आता हे सर्व पाहून झालं की जायचं तें पूर्व दिशेला कारण तिथे एक भव्य बुरुज आणि डौलात फडकणारा भगवा आपले स्वागत करतो. इथून खाली उतरून आपण पुन्हा परतीला लागलो की दर्गा दिसतो; दर्ग्याच्या परिसरात प्रवेश करताच समोर दोन तोफा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. दर्ग्यात जाण्यासाठी पायर्‍यांवरून खाली उतरुन जावे लागते. इथे पूर्वी मार्कंडेय ऋषींची प्राचीन गुहा होती. दर्ग्याच्या भिंतीवर एके ठिकाणी दोन दगडी कमळ कोरलेले स्पष्टपणे दिसतात.

गाडी रस्त्याने पुन्हा गडाच्या मध्याकडे जायला लागताच रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात. तीन मंदिरापैकी रस्त्याच्या उजव्या हातास असणाऱ्या पहिल्या मंदिरात जाण्यासाठी रस्त्याकडेला काही दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून जाताच समोर एकावर एक दगड रचून तयार केलेल्या कुंपणाच्या आवारात एक छोटेखानी महादेवाचे मंदिर दिसते.

येथे मंदिरासमोर एक दगडी दीपमाळ, स्तंभ, गणेशाची मूर्ती, दोन शिवलिंग व नंदी असे भग्नावशेष आहेत. हे मंदिर पाहून पुन्हा गाडी रस्त्यावर परत यायचे आणि आता रस्त्याच्या डावीकडे थोडे आत असणाऱ्या दुसऱ्या मंदिराकडे निघायचे. हे आहे गडावरील देवीचे मंदिर. या छोट्या दगडी मंदिरावरील असणारी दोन कोरीव शिल्पे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.

हि दोन्ही मंदिरे पाहून आपला मोर्चा समोर दिसणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या मंदिराकडे वळवायचा. हे मंदिर रस्त्याच्या डाव्या बाजूला पण रस्त्याला लागुनच आहे. या दगडी मंदिराबाहेर हनुमंतांचे एक भग्न शिल्प ठेवलेले आहे.

तर मग कधी निघताय???
कोल्हापूरचे हे वैभव अनुभवायला विसरू नका...
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News