ज्ञानबा... तुकाराम! दुसऱ्या अ.भा.वऱ्हाडी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीने सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

अकोला - दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. गांधी मार्गावरील निशांत टॉवर परिसरातून सकाळी ९ वाजता वारकरी भजनी मंडळाची पाऊली आणि मराठी सारस्वताला संत साहित्यासह वऱ्हाडी साहित्यातून मिळालेले ग्रंथ पालखीमध्ये घेऊन मार्गक्रमणास सुरुवात झाली.

अकोला - दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली. गांधी मार्गावरील निशांत टॉवर परिसरातून सकाळी ९ वाजता वारकरी भजनी मंडळाची पाऊली आणि मराठी सारस्वताला संत साहित्यासह वऱ्हाडी साहित्यातून मिळालेले ग्रंथ पालखीमध्ये घेऊन मार्गक्रमणास सुरुवात झाली. ढोलताश्यांच्या गजरात पालखी संमेलनस्थळाला निघताना आकर्षक रथात वऱ्हाडचे सुपुत्र व दुबईमध्ये व्यावसायिक जाळे उभारणारे मसालाकिंग तथा स्वागताध्यक्ष डाॅ.धनंजय दातार व ज्येष्ठ संपादक तथा संमेलनाध्यक्ष प्रकाश पोहरे यांना विराजमान करून वऱ्हाडातून ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य साहित्यिकांच्या सोबत ही ग्रंथ दिंडी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मदनलाल धिंग्रा चौक मार्गे सुंदराबाई खंडेलवाल टॉवर चौक येथे पोहचली. याठिकाणी दिंडीची मराठा सेवासंघाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. पुढे अग्रसेन चौक मार्गे दीपक चौकातून उध्दव ज.शेळके साहित्य नगरी (मराठा मंडळ सभागृह) येथे दिंडीचे जल्लोषात समापन करण्यात आले. 

वऱ्हाडी कॅटवॉकने मन मोहिले
कॅटवॉक स्पर्धा अापण एेकलीच असेल. मात्र, शहरात आज रविवार (ता.२) अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आगळी वेगळी वऱ्हाडी कॅटवॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची ही भन्नाट कल्पना विचारपीठावर मोहक ठरली. महिलांनी पारंपरिक नऊवारी लुगड्यात तर पुरुष धोतर, सदरा परिधान करून या वऱ्हाडी कॅटवॉक स्पर्धेत सहभागी झाले होते.

बहारदार कवीसंमेलन
दुसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उध्दव शेळके साहित्य नगरीमध्ये शंकर बढे विचारमंचावर वऱ्हाडातील कवींची मांदीयाळी पहायला मिळाली. खुमासदार वऱ्हाडी कवीता साहित्य संमेलनात भाव खाऊन गेल्या.

सुप्रसिध्द हास्यकवी ॲड.अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेत व सुरेश पाचकवडे, अरविंद भोंडे, विजय दळवी, प्रमोद काकडे, नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बहारदार कवी संमेलनाने उपस्थितांचा उत्साह वाढविला. या कवी संमेलनाचे सुत्रसंचालन किशोर बळी आणि अनिकेत देशमुख यांनी केले तर निलेश कवडे यांनी आभार मानले. यासोबतच नितीन वरणकार, तुळशीराम मापारी, शिवलिंग काटेकर, रविंद्र महल्ले, विलास ठोसर, मधुराणी बन्सोड, रविंद्र दळवी, निलेश देशमुख, धनश्री किशोर पाटील, निलू मानकर, ईश्वर मते, अरविंद उन्हाळे, विजय बिन्दोड, विजय ढाले, उमेश थोरात यांनी कविता सादर केल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News