जेवणानंतर बडीशेप का खातात? जाणून घ्या! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

हॉटेलमध्ये जेवणानंतर आपल्याला बडीशेप खाण्यास दिली जाते. बडीशेप खाल्ल्यानंतर मुखशुद्धी होते. तोंडाला दुर्गंध येत नाही. परंतु यापेक्षाही आणखी एक प्रमुख कारण आहे. जड अन्न पचण्यासाठी बडीशेप ही फायदेशीर असते. बडीशेप ही गॅस कमी करणारी व उत्तम पाचक आहे. त्यामुळे जेवणानंतर पोट फुगणे, पचनास त्रास होणे यांसारख्या समस्या जाणवत नाही, म्हणूनच हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते. 

बडीशेपमध्ये असलेल्या पॉटेशिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बडीशेप+साखर चावून खाल्ल्यास उलट्या थांबतात. बडीशेप ही डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांची जळजळ कमी होण्यास बडीशेप फायदेशीर ठरते. 

बडीशेपमध्ये क जीवनसत्त्व, पॉटेशिअम, मॅगनिज,  लोहं यांसारखी खनिजे असतात.  जेवणानंतर बडीशेप खाण्याचा सल्ला दिलो जातो. पोट आणि पचनाच्या अनेक समस्यांवर बडीशेप ही फायदेशीर आहे. जेवल्यानंतर  बडीशेप खाल्ल्यानंतर वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News