जाणुन घ्र्या रात्रीच्या वेळेस घाम येत असल्यास काय करावे

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

अंगातले कपडे आणि गादीवरची चादर ओली होईपर्यंत तुम्हाला घाम फुटला आणि त्यामुळे गाढ झोपेतून तुम्ही दचकून जागे झालात, तर ते एखादवेळेस महत्त्वाच्या आजारांचे लक्षण असू शकते.

एखाद्याला रात्री झोपेत असताना जर घाम फुटला, तर त्याचे संपूर्ण कुटुंब धावपळ करत जवळच्या डॉक्‍टरांचे दरवाजे ठोठावतात किंवा रुग्णालयात भरती करतात.झोपताना जर तुम्ही दोन-तीन जाडजूड ब्लॅंकेट्‌स घेऊन झोपला असाल किंवा पंखा, एसी बंद असल्याने तुमचे शयनगृह जास्त उबदार झाले असेल, उन्हाळ्यात खूप उकडत असेल, तर असा घाम आला तरी काळजीचे काही कारण नसते. मात्र, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील आणि झोपेत तुमचे अंगातले कपडे आणि गादीवरची चादर ओली होईपर्यंत तुम्हाला घाम फुटला आणि त्यामुळे गाढ झोपेतून तुम्ही दचकून जागे झालात, तर ते एखादवेळेस महत्त्वाच्या आजारांचे लक्षण असू शकते. याला वैद्यकीय लक्षणांमध्ये ‘नाइट स्वेट’ म्हणतात. 

घाम येणे ही शरीरातील उत्सर्जनाची क्रिया असून नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्त अन्य वेळी घाम येणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असते. शरीराचे तापमान नियंत्रित होण्याचे कार्य घाम येण्याच्या यंत्रणेमार्फत होत असते. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे ‘हायपर हायड्रोसिस’ म्हटले जाते. घाम येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. पण घाम आल्यावर अनेकांची प्रतिक्रिया अगदी टोकाची असते. तसे पाहायला गेले, तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण त्या व्यक्तीला अनेकदा बऱ्याच त्रासांचा सामना करावा लागतो.

प्राथमिक उपाय

  •  झोपण्याची खोली थंड व्हावी या उद्देशाने पंखा, कुलर, एसी वापरावा. खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात.
  • अंगावर जाड ब्लॅंकेट घेण्याऐवजी पातळशी चादर किंवा दुलई, रजई पांघरावी.
  • नेहमी घाम येत असल्यास उशीखाली आईसपॅक ठेवावा.
  • झोपण्यापूर्वी थंड पाणी प्यावे. घाम येऊ लागल्यावर आणि त्यानंतरही डीहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पीत राहावे.
  • झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळावे.
  • झोपायच्या आधी थोडावेळ थंड पाण्याने अंघोळ करावी.
  • झोपण्यापूर्वी मसालेदार जेवण, धूम्रपान, मद्यपान टाळावे.
  • ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा, रीलॅक्‍सेशन टेक्‍निक्‍स अशा पद्धतींचा वापर करावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News