ऑफिसमध्ये होणाऱ्या टीकेपासून कसे वाचाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019

आपण कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत अनेक मित्र आणि सहकारी होतात पण प्रत्येकवेळी चांगलेच लोकं आपल्याला भेटतील अशी शक्यता कमी असते. अनेकजागी ऑफिसात असे सहकारी भेटतात ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक उर्जा येते.

आपण कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत अनेक मित्र आणि सहकारी होतात पण प्रत्येकवेळी चांगलेच लोकं आपल्याला भेटतील अशी शक्यता कमी असते. अनेकजागी ऑफिसात असे सहकारी भेटतात ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक उर्जा येते. या नकारात्मतेला कंटाळून तुम्ही अनेकदा चुकीचे निर्णय घेतो ज्याचा पश्चाताप नंतर होतो. ऑफिसमध्ये होणाऱ्या टीकेपासून कसं वाचायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीकांचं स्वागत करा-  जर तुम्ही टीकेमधून शिकून तुमचं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हालाच सर्वाधिक फायदा होईल. तुमच्यावर टीका करणाऱ्यांचं नेहमीच स्वागत करा. आयुष्यात यश फक्त मेहनत आणि विश्वासाच्या जोरावरच मिळतं असं नाही तर यात टीकेचीही महत्त्वाची भूमिका असते.

दुसऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींचा फार विचार करू नका- अनेकदा कॉलेज आणि ऑफिसमध्ये दुसऱ्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी कानावर पडत असतात. तिसरी व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते याची माहिती तुम्हाला मिळते. पण अशा पद्धतीच्या गोष्टी या अफवाही असू शकतात किंवा तुम्हाला त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या असू शकतात. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर थेट विश्वास ठेवून स्वतःहून टीका ओढवून घेऊ नका. तिसऱ्या व्यक्तिने सांगितलेली गोष्टी एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या.

ग्रुप करू नका- तुम्हाला हे माहीत आहे का कोणत्याही प्रकारच्या ग्रुपीझमचं मोठं नुकसान तुम्हाला भोगावं लागू शकतं. अनेकदा कॉलेज आणि ऑफिसमधले लोक अनेक ग्रुपमध्ये विभागलेले असतात. अशावेळी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्यापूर्वी सगळ्यांसोबत एकसारखं वागा. ग्रुपमुळे तुम्ही स्वतः तुमच्या टीकाकारांना बोलण्याची संधी देता.

टीकेचं कारण जाणून घ्या- अनेकदा जवळचे मित्रच आपले शत्रू होऊन जातात. यानंतर तुम्हाला त्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशावेळी संबंधित व्यक्तीसोबत वादात अडकण्यापेक्षा तुमच्यात काय कमतरता आहे आणि समोरच्याची वागणूक कशी आहे याचं निरीक्षण करा. अशी व्यक्ती भविष्यात तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News