जाणून घ्या... अकरावी प्रवेशप्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • शहरात 22 हजार 560 हजार ऑनलाईन 
  • ग्रामीणच्या 51 हजार 800 जागांवर ऑफलाइन प्रवेश 

नाशिक: दहावीचा निकाल शनिवारी (ता. 8) जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. नाशिक महापालिका हद्दीत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत उपलब्ध 22 हजार 560 जागा ऑनलाइन भरल्या जातील. तर ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांत उपलब्ध 51 हजार 800 जागा ऑफलाइन स्वरूपात भरल्या जाणार आहेत.
 
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच नाशिक महापालिका हद्दीत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. याअंतर्गत प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या माहितीपुस्तिकांचे वाटप शाळांमार्फत सुरू झाले होते व अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली होती. त्यास प्रतिसाद देत दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरलेला आहे. 
यापुढेही विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. तर दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सोमवारपासून (ता. 10) अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. भाग दोनमध्ये शाखा, महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. ऑफलाइन प्रवेशात महाविद्यालय स्तरावर प्रवेश दिले जातील. 

शहरातील अकरावीच्या जागांची स्थिती अशी- 

  विज्ञान    वाणिज्य   कला कॉम्पोझिट 
अनुदानित   3680   3760  3720  240 
विनाअनुदानित     3640 3160 840 320 
स्वयंअर्थसहाय्य        2120    840    
240  
  -- 
एकूण  
9440  
 7760   4800        560 

ग्रामीण भागातील अकरावीच्या जागांची स्थिती- 
 

  विज्ञान कला     वाणिज्य    कॉम्पोझिट 
अनुदानित           4920               2760         16080             1240 
विनाअनुदानित       7560 2800  8440 160 
स्वयंअर्थसहाय्य     4600 1040 2120  80
एकूण              17080    6600     26640  1480
 

  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News