जाणुन घ्या आहाराबाबतचे सोपे नियम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019

कुणी चौरस आहार देण्याचा प्रयत्न केला आणि ‘एक पालेभाजी, वाटीभर उसळ, एक आंबट, एक गोड फळ खा,’ असा उपदेश केल्यास ते हसतीलच!

डॉ. राजीव शारंगपाणी, क्रीडावैद्यक तज्ज्ञ

भौगोलिक परिस्थितीनुसार मानवाचा आहार बदलतो. एस्किमो लोक त्यांच्या उभ्या आयुष्यात पालेभाजी म्हणजे काय, ते पाहतसुद्धा नाहीत. त्यांचा आहार मासे, रेनडिअरचे मांस हाच असतो. त्यांना कुणी चौरस आहार देण्याचा प्रयत्न केला आणि ‘एक पालेभाजी, वाटीभर उसळ, एक आंबट, एक गोड फळ खा,’ असा उपदेश केल्यास ते हसतीलच!

त्यामुळे आपल्या आहाराबद्दल काही सोपे नियम लक्षात ठेवण्याची गरज आहे. 

१. शारीरिक परिश्रम तुमचा आहार ठरवतात. तुमचे वजन वाढत असल्यास तुम्ही अनावश्‍यक खात आहात. 
२. ताकदीचे व्यायाम करत असल्यास प्रथिनांचा समावेश जास्त लागेल. त्यात अंड्याचा पांढरा भाग, डाळी, कडधान्ये, दूध, मांस, मासे यांचा समावेश होतो. 
३. दमश्‍वासाचे व्यायाम करत असल्यास कार्बोडायड्रेट्‌स आहारात जास्त लागतील. 
४. प्रत्येक मोसमातील सर्व फळभाज्या, पालेभाज्या, फळे भरपूर खा.
५. भलत्या मोसमात भलत्या गोष्टी कृत्रिमरीत्या टिकवून खाणे शक्‍यतो टाळा.
६. नैसर्गिक पदार्थांचे प्रमाण आहारात जास्त असू द्या.
७. त्या-त्या देशात तेथील माणसांप्रमाणे खा. उगाच तोंड वेंगाडून ‘वरण-भाताची’ आठवण करू नका.
८. खायचे ते आनंदाने खा. आज तुम्हाला खायला मिळते, त्यामागे ते अन्न पिकविणारे शेतकरी, मजूर त्यांचे श्रम असतात. त्यांची आठवण ठेवा. 
९. आज समोर अन्न म्हणून आहे, ते उद्या तुमच्याच शरीराचा भाग होणार आहे. त्याचे आनंदाने स्वागत करा! 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News