सगळ्यांपासून लांब असलेले खऱ्या आयुष्यातले नील आर्मस्ट्राँग जाणून घ्या...

सुरज पाटील
Saturday, 20 July 2019

चंद्रावरून जग पाहाणारा पहिला अंतराळवीर म्हणजे नील आर्मस्ट्राँग.

मानवाचं हे लहानसं पाऊल, मानव जातीची एक मोठी झेप असणार आहे'. 

20 जुलै 1969 या दीवशी चंद्रावरून जग पाहाणारा पहिला अंतराळवीर म्हणजे नील आर्मस्ट्राँग. 19 जुलै ते 24 जुलै अशा सहा दिवसांच्या मोहिमेमध्ये नीलसोबत बझ ऑल्ड्रिन आणि मायकल कलिन्स  असे तिघांनी इतिहास रचला. चंद्रावरून परतल्यानंतर अनेक देशांकडून नील यांचा सत्कार करण्यात आला, मात्र अत्यंत संयमी आणि शांत असलेल्या नील यांनी सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेतली.

'नील यांना एकांतात राहाण्यास खूप आवडायचे' हे त्यांच्याबद्दलचं चुकीचं विधान आहे, असं त्यांची नात कॅली हिने सांगतिले. चंद्रावर पाऊल ठेवणारा हा पहिला माणुस असला तरी ती व्यक्ती मनमोकळी, वैचारिक आणि समजुतदार होती.

नील आर्मस्टाँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर एक वाक्य उद्गारलं होतं, ते म्हणजे मानवाचं हे लहानसं पाऊल, मानव जातीची एक मोठी झेप असणार आहे'. त्यांनी तरुणांना प्रोत्साहन देण्याच काम अख्ख्या आयुष्यात केलं. नील हे विचारी बुध्दीटे होते, त्यांची विनोदबुध्दी लोकांना त्यांच्याजवळ टिकवून ठेवत असे, तर कधीकधी रस्त्यावरून चालताना ते ओक्लाहोमाची गाणीदेखील ऐकत असल्याची माहिती त्यांची नात कॅली यांनी दिली.

नील यांना मुलाखत देणे कधीच पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या अफवा आणि काहीप्रमाणातल्या चर्चांना उधाण आले होते. नील आर्मस्टाँग यांनी ही शूर मोहिम राबिवली असली तरी त्यांनी प्रसिध्दी झोतापासून लांब राहाणेच पसंत केले. एक उत्तम शिक्षक, संगीतकार, योग्य पालक आणि सर्वोत्कृष्ठ इंजिनिअर म्हणून त्यांनी नाव कमावले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News