जाणून घ्या, भारतातील सर्वात स्वस्त 'परफेक्ट हनिमून डेस्टिनेशन'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

विदेशाप्रमाणे भारतात देखील फिरण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी तुम्ही कमी खर्चात बेस्ट हनिमून प्लॅन करू शकता. 

सध्या सर्वत्रच लगीनघाई पाहायला मिळत आहे. प्री वेडिंग शुटपासून लग्नापर्यँत सर्व गोष्टी या ठरल्याप्रमाणे पार पाडण्याचा  तरुणाईचा कल असतो. लग्नांनंतर हनिमून डेस्टिनेशन फायनल करण्याकडेही तेवढाच जोर असतो. विदेशात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. मात्र अधिक खर्च होत असल्यामुळे अनेकजण आपले प्लॅन कॅन्सल करतात. विदेशाप्रमाणे भारतात देखील फिरण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी तुम्ही कमी खर्चात बेस्ट हनिमून प्लॅन करू शकता. 

भारतातील गोवा, कुलू-मनाली, उटी, मुन्नार, यांसारखी ठिकाणे नेहमीच हनिमूनसाठी लोकप्रिय ठरली आहेत. मात्र या ठिकाणांशिवाय भारतात असे अनेक डेस्टिनेशन आहेत ज्याठिकाणी कपल्स जाऊ शकतात. स्वस्त आणि मस्त अशी ही ठिकाणे आहेत. 

लक्षद्वीप 
लक्षद्वीप हे हनिमून डेस्टिनेशनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी पर्यटकांना देखील जाण्याची संधी मिळते. याशिवाय कठमठ, मिनीकॉय, कवरत्ती, बंगाराम, कल्पेनी आणि अगाती या बेटांवर देखील हनिमूनचा पर्याय चांगला ठरू शकतो.  बेटांवर जाणाऱ्यांची संख्या कमी असते, याशिवाय निवांत असा वेळ देखील याठिकाणी मिळतो. या बेटांवरील समुद्रामध्ये स्नोर्केलिंग करण्याची संधी देखील घेऊ शकता. यावेळी समुद्रातील जीवसृष्टीचे देखील दर्शन घडते. अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात. याठिकाणी राहण्यासाठी सहा हजार रुपये खर्च येतो. 

हम्पी 
प्राचीन संस्कृतीबद्दल आकर्षण असलेल्या जोडप्यांनी हम्पी येथे नक्की जावे. कर्नाटकातील हम्पी हे स्थळ पर्यटकांसाठी उत्तम आहे. 'वर्ल्ड हेरिटेज साईट'  करण्यात आले आहे. याठिकाणी विविध स्मारके आणि मंदिरे आहेत. हम्पी आणि आजूबाजूचा प्रसार पाहण्यासाठी किमान चार दिवस याठिकाणी वास्तव्य करावे. यासाठी बारा हजार रुपये किमान खर्च येतो. 

लद्दाख 
निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर लद्दाख हा पर्याय उत्तम ठरेल. थंड हवेच ठिकाण त्यासोबतच विविध पर्वतरांगा, मोकळे रस्ते, बर्फाची चादर असं भान हरपायला लावणारे निसर्गसौंदर्य त्याठिकाणी आहेत. याठिकाणी उत्तम राहण्याची व्यवस्था देखील आहे. 

काश्मीर 
फिरण्यासाठी सुंदर असं ठिकाण म्हणजे काश्मीर..! याठिकाणी पर्यटकांसोबतच हनिमूनसाठी येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यासाठी श्रीनगर विमानतळावर उतरून आजूबाजूला फिरण्यासाठी अनेक स्थळे आहेत. चार दिवस राहण्यासाठी याठिकाणी किमान वीस हजार रुपये खर्च होऊ शकतो. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News