kiss day: किस करताना प्रेयकरासोबत घडले असे काही पोहचला थेट रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020

प्रेयकराने फेंच किस करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात प्रेयसीने त्याच्या जिभेचा तुकडा पाडला. त्यामुळे बळजबरीने फ्रेंच किस करणे प्रेयकराला चांगलेच आंगलट आले. 

प्रेमी युगलांसाठी फेब्रुवारी महिना विशेष असतो, खास करुन 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे (प्रेमाचा दिवस) म्हणून जगभर साजरा केला जातो. जगभरातील प्रेमी युगल वर्षभर 'व्हॅलेन्टाईन डे' ची आतुरतेने वाट पाहतात. 'व्हॅलेंटाईन डे' आधी 'व्हॅलेंटाईन आठवडा' (Valentine Week) सुरु होतो.

संपुर्ण आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. सात दिवस आपल्या प्रियजनाना वेगवेगळे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केल जाते. 'व्हॅलेन्टाईन डे आठवड्यातची सुरुवात 7 जानेवारीला होते आणि 14 जानेवारी पर्यंत चालतो. 13 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन आठवड्याचा सातवा दिवशी प्रेमी युगल एकमेकांची किस घेऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.

किस डे साजरा करण्यासाठी प्रेमी युगल अमोरिकेच्या डेट्राईट शहरातील एका रोमॉंटीक हॉटेल मध्ये भेटले. दोघांनी बराच वेळ गप्पा केल्या. त्यांनतर किस करण्यासाठी प्रेमी युगल एकमेकाजवळ आले. प्रेयकराने फेंच किस करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात प्रेयसीने त्याच्या जिभेचा तुकडा पाडला. त्यामुळे बळजबरीने फ्रेंच किस करणे प्रेयकराला चांगलेच आंगलट आले. 

प्रेयसीने जिभेला चावल्यामुळे प्रेयकर जोरात ओरडला. हॉटेलमधल्या लोकांनी प्रेयकराला तात्काळ रुग्णालयात दाखल गेले आणि प्रेयसीला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रियकराचे नाव यूलेट वेगेवॉर्थ असून सध्या त्याच्यावर उपाचार सुरु आहेत. पोलिसांनी किस प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली आणि आरोपीचा जबाब नोंदवला. प्रेयकराला साधी किस घेण्यासाठी प्रेयसीने सांगितले होते मात्र, प्रेयकर फ्रेंच किस घेत होता त्यामुळे प्रेयसीने प्रेयकराच्या जिभेला चावा घेतल्याचे चौकशीत उघड झाले. 

घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. 1 इंट लांब प्रेयकराच्य़ा जिभेचा तुकडा पोलिसांना सापडला. पोलिसांनी प्रेयसीला अटक करुन जेलमध्ये ठेवले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News