किंग खानचीही वेबसीरिजमध्ये उडी ? 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Tuesday, 19 March 2019

‘बदला’ चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे किंग खान शाहरूख सध्या खुशीत आहे. या चित्रपटानंतर शाहरूख एका नव्या प्रोजेक्‍टवर काम करत आहे. तो आता एका वेबसीरिजची निर्मिती करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो एका थ्रिलर वेबसीरिजची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये तो स्वतःही काम करणार आहे.

या थ्रिलर वेबसीरिजची कथा त्याला फारच आवडली आणि म्हणूनच या सीरिजच्या निर्मितीची धुरा त्याने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट, मालिकांच्या दुनियेत डिजिटल माध्यमही अधिक प्रभावशाली होऊ लागलं आहे.

तसेच अक्षयकुमार, नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान हे प्रसिद्ध चेहरे वेबसीरिजकडे वळले आहेत. आता शाहरूखनेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत वेबसीरिजची वाट धरली आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News