हास्यसम्राटाचा बादशाह; डॉ. विष्णू सुरासे आणि विनोदाची सफर

सुरज पाटील,यिनबझ
Sunday, 5 May 2019

जगात माणसाला जगायला काय हवं असतं? समृध्द मन, शांती आणि सुख; पण त्याच बरोबर गरजेचं असतं ते म्हणजे आनंद. जो आनंद मिळतो तो प्रत्येक गोष्टीतून आणि विनोदातून. अशाच विनोदाविराशी केलेल्या या खास गप्पा...

जगात माणसाला जगायला काय हवं असतं? समृध्द मन, शांती आणि सुख; पण त्याच बरोबर गरजेचं असतं ते म्हणजे आनंद. जो आनंद मिळतो तो प्रत्येक गोष्टीतून आणि विनोदातून. अशाच विनोदाविराशी केलेल्या या खास गप्पा...

डॉ. विष्णू सुरासे, हे सध्या औरंगाबाद येथील विवेकानंद कॉलेजमध्ये पद्यूत्तर विभागात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देखील हास्यरंगाचे कार्यक्रम ते घेत असतात. 'मानसाला हसवणे हाच माझा धर्म' या तत्वावरती दरवर्षी महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या या हस्यरंगाच्या बादशाहाची कहाणीच काही और आहे.

माणुस जगतो आणि शिकतो ते म्हणजे मातीतून. मातीत त्याचा जन्म झालेला असतो. मातीच त्याला वेगवेगळे अनूभव शिकवत असते आणि डॉ. विष्णू यांच्या विनोदीशैलीचा उगम झाला, तो म्हणजे याच मातीतून. डॉ. विष्णूंच्या मते त्यांची नाळ अजूनही त्यांच्या मातीशी जोडली आहे. ज्या रानातून आयुष्याची सुरूवात झाली त्या रानाने मला विनोद करायला शिकवले. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या सत्या घटनांवरती त्यांचे विनोद आधारित असतात. राजकारण, समाजकारण, सत्ताकारण, व्यंगात्मक भाष्य  नवरदेवाची सुरू असलेली वरात, निवडणुक, लग्नातली पंगत, तरुणाईला असलेले फॅशनचे वेड, वेगवेगले प्रसंग, आपल्या परिस्थितीची जाणीव असे अनेक विषय त्यांच्या विनोदाचा गाभा असतात.

आपल्या विनोदी शैलीबद्दल बोलताना डॉ. विष्णू सुरासे...
विनोदामागे एक भावना दडलेली असते. प्रत्येकवेळी माणसाला असलेलं दु:ख, वेदना हे समोरच्या मानसाशी शेअर करता येत नाही. त्यावेळी ती व्यक्ती हासण्याचा प्रयत्न करत असते तर कधी-कधी समोरच्याला हसवण्याचादेखील प्रयत्न करते. माझ्या मते अशा वेदना, दु:खांमध्ये असलेली माणसेच मोठ्याप्रमाणात विनोद करत असतात.

मी माझ्या करिअरमध्ये स्वत: केलेला धंदा म्हणजे. ज्यूस सेंटरवर केलेलं काम. त्यावेळी वेगवेगळ्या माणसांच्या वृत्ती, प्रवृत्ती, त्यांचे हावभाव, बोलण्याची भाषा, पध्दत, त्यांच्या हालचालीवर लक्ष अशा अनेक ढंगाने समोरच्या माणसाला मी न्याहाळत असे. त्यातून मला प्रत्येक नवा विनोद मिळत गेला आणि त्या विनोदाला अनुसरूण असा हावभाव मिळत गेला. 

माझ्या विनोदामध्ये खेड्यातील अस्सल वेदना लपलेली असते. अत्यंत गरिब कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे परिस्थितीने चांगलाच मला आयुष्याचा धडा शिकवला होताच, पण त्याहीपेक्षा शिकवलं ते शाळेत जाण्याआधी ज्या रानात काम करण्यास जात होतो, त्या रानाने. 

माझ्या आयुष्यातला पहिला गुरू म्हणजे माझी आई. ती आडाणी होती, पण मी शिकावं आणि आमची असलेली गरिबी मी नाहीशी करावी असं आईला खूप वाटत होतं. तीच एकच म्हणन होतं, मी पुस्तकं खूप वाचावीत. कारण पुस्तके हीच आपला आदर्श असतात. मी वाचलेली महाविद्यालयीन जीवनातील पुस्तके हेच माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक बनत गेले. 

तरुणाईला सल्ला...
आताची तरुणाई वाचानापासून खूप लांब पळत आहे. कित्येक जणांना तर परिस्थितीची जाणीवही नसते. समाजातील मोठी माणसं, समाज, संस्कार अधुनीक तंत्रज्ञान या साऱ्यांचा तरणाईला विसर पडल्यासारखा झाला आहे, त्यामुळे स्पर्धेच्या युगात आपला पाय भक्कम करायचा असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे वाचन आणि अपडेट राहणे खूप गरजेचे असते. 

जागतिक हास्यदिनाबद्दल...
माझ्या वयक्तीक मतानुसार गोर-गरिबत माणसंच खळखळ हसत असतात. आपलं दु:ख कितीही असलं तरी दु:खावर मात करणे, हे त्यालाच जमतं ज्याने आयुष्यात हसणे आकस्मात केलं. माझ्या हसण्याची आणि हसवण्याची सुरूवातसुध्दा याच गरबीतून झाली. चेहऱ्यावर आनंद खळखळून हसणे, सतत चेहऱ्यावर चैतन्य ठेवणे हेच माझ्या आयुष्याचे गमक आहे आणि मी ते कधीच गमावणार नाही. त्यामुळे जागतिक हास्य दिनाच्या माझ्यासारख्या सर्व हस्यसम्राटांना हार्दिक शुभेच्छा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News