तरूणीची उशीने तोंड दाबून हत्या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

विशेष म्हणजे या प्रकरणात आंतरजातीय मुलगा असल्यामुळे गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जळगाव - प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अनेक तरूणीची हत्या किंवा आत्महत्या झाल्याच्या घटना आपण नेहमी पाहत असतो, पण आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याने आईवडिलांनी मुलीची हत्या केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. 

भुसावळ मधील तळवेल गावात ही तरूणी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिचे तेथील मुलावरती प्रेमसंबंध होते. हे प्रकरण तिच्या आई-वडिलांच्या कानावर पडले. त्यानंतर आई-वडिलांनी मुलीला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु मुलगी काही ऐकत नसल्याचे लक्षात येताचं, तीची हत्या केली. विशेष म्हणजे या प्रकरणात आंतरजातीय मुलगा असल्यामुळे गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुलीच्या वडिलांचं नाव सुधाकर मधुकर पाटील आणि आईचं नाव नंदाबाई पाटील (४०) असं आहे. मुलगी लग्न करणार असल्याचे बाहेरून समजल्याने त्यांनी हे पाऊलं उचलल्याचे तेथील काही स्थानिकांचं म्हणणं आहे. 

शवविच्छेदन अहवाल...

मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात घबराहट पसरली होती, पण ही खबर पोलिसांना लागली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यास तेथील शासकीय रूग्णालयात पाठवला. त्यानंतर तीचा उशीने गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिच्या आईवडिलांना बोलावून चौकशी केली, चौकशीत त्यांनीचं पोटच्या मुलीची हत्या केल्याचे कबूल केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News