'तुला मारून स्वतः ही मरेल' म्हणत तरुणाने केलं असं काही... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020
  • अक्षय आणि संबंधित मुलगी एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यावेळी त्यांचं बोलणे सुरु होते. तेव्हाही अशाच प्रकारे तो त्रास देत असल्याचे पीडित तरुणीने सांगितले.

पुणे : तरुणीवर असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे तरुणाने चक्क गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. जुन्नर येथील जांभूत फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचे नाव अक्षय भाऊसाहेब दंडवते असून तो २२ वर्षांचा आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे. 

जुन्नर येथील राहणारा अक्षय हा अनेक दिवसांपासून एका तरुणीच्या मागे होता. पीडित तरुणी आपले क्लासेस संपवून मैत्रिणीसोबत घरी जात असताना त्याने रस्त्यातच तिला अडवले.

तिच्या डोक्याला बंदूक पिस्तूल लावून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटली नाही, असा प्रयत्न त्याने चार ते पाच वेळा केला. "मी तुला मारून स्वतः ही मरेल" म्हणत तो पिस्तूल चालवत होता.

मात्र त्याला गोळी चालवता आली नाही. त्यावेळीच तरुणीने आरडा-ओरड करून आजूबाजूच्या लोकांना जमा केले. लोकांना येताना पाहताच अक्षय तिथून पळून गेला. 

अक्षय आणि संबंधित मुलगी एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यावेळी त्यांचं बोलणे सुरु होते. तेव्हाही अशाच प्रकारे तो त्रास देत असल्याचे पीडित तरुणीने सांगितले.

दरम्यान कॉलेज संपल्यानंतर देखील पीडित तरुणीला तो त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केलं आहे. याबाबत पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतलं असून ते पुढील कारवाई करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News