कियाराचा चित्रपटासाठी नकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 December 2019

कियाराने हा चित्रपट साईन केला होता. मात्र, ऐन मोक्‍यावर तिने या चित्रपटासाठी नकारार्थी मान हलवली आहे. कियारा एकाच वेळी दोन ते तीन प्रोजेक्‍टवर काम करत आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर कियाराचा फॅनफॉलोईंग भलताच वाढला आहे. शिवाय अनेक हिंदी चित्रपटांसाठीही तिला विचारणा होत आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे अभिनेता वरूण धवनसोबतचा ‘मिस्टर लेले’.

शशांक खेतान या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. कियाराने हा चित्रपट साईन केला होता. मात्र, ऐन मोक्‍यावर तिने या चित्रपटासाठी नकारार्थी मान हलवली आहे. कियारा एकाच वेळी दोन ते तीन प्रोजेक्‍टवर काम करत आहे. अशातच ‘मिस्टर लेले’साठी तिला पुरेसा वेळ देणं शक्‍य नव्हतं.

म्हणूनच तिने या चित्रपटामधून काढता पाय घेतला आहे. भूमि पेडणेकरही या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. पण कियाराने हा चित्रपट नाकारल्यानंतर कोणती अभिनेत्री या चित्रपटात तिची जागा घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News