विद्यर्थी क्रीडा केंद्रात रंगतायेत खो-खोचे अतितटीचे सामने..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

वैभव स्पोर्टस क्‍लब या संघाचा ५-४ असा एका गुणाने पराभव करून विद्यर्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या मुंबई जिल्हा किशोर-किशोरी खो-खो फेरीत आगेकूच केली.

मुंबई : ओम साईश्‍वर सेवा मंडळाने वैभव स्पोर्टस क्‍लब या संघाचा ५-४ असा एका गुणाने पराभव करून विद्यर्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या मुंबई जिल्हा किशोर-किशोरी खो-खो फेरीत आगेकूच केली. ओम साईश्‍वरच्या रश्‍मी दळवीने ५ व ४.३० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात २ खेळाडू बाद केले. सुखदा आंब्रेने १.४०, १ मिनीट संरक्षण करून आक्रमणात २ खेळाडू बाद केले. पराभूत वैभवतर्फे स्पृती चंदूरकरने आणि धृती राऊळने कडवी लढत दिली.

किशोरी गटाच्या दुसऱ्या सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर या संघाचा १०-४ असा ६ गुणांनी पराभव केला. सरस्वतीतर्फे संस्कृती भुजबळने २ व ४ मिनिटे पळतीचा खेळा करून चार खेळाडू बाद केले. मनस्वी सकपाळने २.४०, नाबाद १ मिनीट संरक्षण करत आक्रमणात २ खेळाडू बाद केले. अक्षिता खडकाने तीन खेळाडू बाद केले. अमर हिंद मंडळाने शिवनेरी सेवा मंडळ या संघाचा १०-७ असा पराभव केला. अमर हिंदतर्फे खेळताना रुद्रा नाटेकरने नाबाद ५.१० मिनिटे हुलकावण्या दिल्या. स्नेहा शिगवणने १, २.१० मिनिटे संरक्षण केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News