खिलाडी कुमारने स्वतंत्रता दिवसाचे निमित्त साधून देशवासियांना केले "हे" आवाहनं

पूजा पवार
Saturday, 15 August 2020
  • अभिनेता अक्षय कुमार अनेकदा आपले सामाजिक भान लक्षात घेऊन देशातील विविध घटकांना वेळोवेळी मदत करीत असतो.
  • अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटातूनही देश प्रेमाची भावना व्यक्त होत असते.

मुंबई :- अभिनेता अक्षय कुमार अनेकदा आपले सामाजिक भान लक्षात घेऊन देशातील विविध घटकांना वेळोवेळी मदत करीत असतो. अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटातूनही देश प्रेमाची भावना व्यक्त होत असते. असा हा खिलाडी कुमार कधी सैनिकांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी पुढे सरसावतो तर जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देतो तर अनेकदा उत्तराखंड, सांगली कोल्हापूर, केरळ याठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी देखील देशवासीयांच्या मदतीसाठी धावून जातो. आज भारताच्या ७४ व्या स्वतंत्रता दिवसाचे निमित्त साधून अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट करत देशवासियांना आवाहन केले आहे. त्यात अक्षय कुमारने रस्त्यावरती फळ-भाजी विक्रेते, लहान सहान गोष्टी विकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात काही महिन्यांनपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु या महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनपायी रस्त्यावर, सिग्नलवर लहान सहान गोष्टी विकणाऱ्या गरीब लोकांचे व्यवसाय मात्र ठप्प पडले. व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांचे आतोनात हाल झाले. दोन वेळेच्या जेवणाची देखील भ्रांत जाणवू लागली. कोरोना महामारीतून आपला देश काही प्रमाणात सावरताना दिसत असला तरी पावसाळा ऋतूची सुरु असल्याने रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यांना अजूनही चांगले दिवस आलेले नाहीत. अश्या परिस्तिथीत आपण सर्व देशवासीयांनी या समाजातील घटकांकडे दुर्लक्ष न करता आपल्या जमेल तशी मदत या लोकांना करावी असे आवाहन खिलाडी कुमारने केले आहे.

एखादी गोष्ट आपण त्या लहान व्यवसाय करणाऱ्या गरीब व्यक्तीकडून विकत घेतल्यास कुठेतरी आपण त्यांचे उत्पन्न वाढवण्यात हातभार लावू शकतो, आणि असे जर प्रत्येक देशवासीयांनी ठरवले तर आपल्या देशातील कोणताही व्यक्ती हा उपाशी पोटी झोपणार नाही असे अक्षय कुमार त्या विडिओ म्हणतो. आपल्या समाजातील हे लहान घटक आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत त्यामुळे अश्या व्यक्तींना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. अक्षय कुमारचा हा सामाजिक संदेश देणारा विडीओ सोशल मीडियावर वायरल होत असून ह्या विडिओला एका तासात ६ लाख २१ हजार लाईक्स मिळाले आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News