खारेपाटण किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 May 2020

इ.सनाच्या ८ व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात (तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्र्वम्मियराने (इ.स. ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारून राजधानी बसविली. इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला.

मुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव ‘बलिपत्तन’ या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनाऱ्यावर वसलेले आहे. 

प्राचीन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत आणि तेथून खारेपाटण “बलिपत्तन” गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचीन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला किल्ला आहे. 

इ.सनाच्या ८ व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात (तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्र्वम्मियराने (इ.स. ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारून राजधानी बसविली. इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटणा किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजानंतर इतर सागरी आणि खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे यांच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स. १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुत्त्क फौजांनी किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला. इ.स. १८५० मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यात घनघोर युध्द झाले. यात हा किल्ला उध्दवस्त झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला.

खारेपाटण गावातील छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे आणि जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत. खारेपाटण गावातून किल्ल्यावर असलेल्या शाळेकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मातीत गाढले गेलेले बुरूज आणि तटबंदी दिसते.

बालेकिल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे, ते शिवाजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराजवळील विहिरीतून एक भूयार आहे त्याचे दुसरे टोक खाडीवरील “घोडेपथार” या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते. याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’, उध्दवस्त वास्तूंचे चौथरे इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News