खमंग जवसाची चटणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • जवसाची चटणी ही ज्वारीच्या भाकरी सोबत मस्त लागते. ही चटणी घरी करण्यास सहज आणि सोपी आहे.   

जवसाची चटणी खाताना त्यात तेल टाकून ती भाकरी सोबत खाली तर उत्तम लागते.

साहित्य :- 

  • जवस 6 चमचे
  • तीळ 2 चमचे
  • लसूण 7-8 पाकळ्या
  • लाल मिरची 4-5
  • खोबरा तूकडे 5-6
  • जिरं अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार.

कृती :- 

जवस, तीळ, खोबरा, लसूण, लाल मिरची, जिरं काढून ठेवले. एक एक करून सर्व खमंग भाजून घ्यावे. नंतर ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्यात मीठ टाकावे. ही चटणी रोजच्या जेवणात सूध्दा खाल्ली तरी छान ला्गते, वरण-पोळी, भाकरी सोबत खावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News