मन मोहून टाकणारी खाकी

शिल्पा नरवडे
Friday, 7 August 2020
 • 'शांततेच्या काळात जास्त घाम गाळल्यास, युद्धाच्या काळात जास्त रक्तपात होत नाही…’
 • मला स्पर्धा परीक्षेची खूप आवड होती.
 • खाकी कपड्यातील वर्दी तर माझं मन मोहून टाकायची.
 • पण ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे माझे स्वप्न हे अपूर्णच राहिले.

मला स्पर्धा परीक्षेची खूप आवड होती. खाकी कपड्यातील वर्दी तर माझं मन मोहून टाकायची. पण ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे माझे स्वप्न हे अपूर्णच राहिले. स्पर्धा परिक्षेविषयी माझ्या मनात एका तरुणाबद्दल असणारे विचार आणि यशाच्या दिशेने जाण्याचा मार्ग, तसेच कल्पना मांडण्याचा केलेला प्रयत्न.

खरोखरच आजच्या तरूण पिढीला स्पर्धा परिक्षा हा शब्द माहित नाही, असा एकही तरूण आज आपल्याला पाहायला मिळणार नाही. प्रत्येकाचे स्वप्न हे सरकारी नोकरी मिळवणे हेच असते. प्रत्येकालाच आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायचे असते. आणि ते बनण्यासाठी त्याच्याकडे जिद्दही असली पाहिजे. पण खरे पाहिले तर त्यासाठी लागणारे अफाट परिश्रम, आणि संयम या गोष्टीही अंगीभूत असणे गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी, लागणारी मानसिक तयारी, शारिरीक तयारी आणि महत्वाचे म्हणजे ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक विचार, दृष्टीकोन असणे खूप महत्वाचा असतो. स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचे मुख्य समीकरण म्हणजे कृती, सवय, परिणाम हे आहेत.

सध्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे. संपूर्ण जग हे स्पर्ध्येच्या दिशेने चाललेले आहे. प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धडपडत आहे. जणु स्पर्धा परीक्षा हाच प्रत्येकाच्या जिवनाचा मार्ग आहे, की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण स्पर्धा केल्याशिवाय यश देखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचा देखील विचार करायला हवा. प्रत्येक तरुणाने स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे. आणि हा विचार प्रत्येक तरुणांनी स्वतःच्या मनावर  विंबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मला वाटते.

स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे गुण :-

 • फक्त करायचंय म्हणून करायचे नाही. तर जे करायचे ते मनापासून करणे. (फॉलो युअर फॅशन)
 • स्वतःला शंभर टक्के वेळ द्या.
 • आपली आवड काय आहे ती स्वतः निवडा.
 • जे करताय त्याची जबाबदारी स्वतः घ्या.
 • नशिबावर अवलंबून राहू नका.
 • जे आहे त्याला सामोरे जा.
 • जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका.
 • १० ते १२ तास अभ्यास करणे गरजेचे नसून, व्यवस्थित समजून घेणे महत्वाचे आहे.
 • प्रचंड अवांतर वाचनाची गरज.
 • जिद्द, चिकाटी, मेहनत असणे आवश्यक आहे.
 • खूप पैसे भरून क्लोचिंग क्लास करणे गरजेचेच आहे असे नाही कारण स्वतः मनापासून समजून घेऊन अभ्यास करणे महत्त्वाचे (सेल्फस्टडी महत्वाचा) आहे.
 • स्वतःवर आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे.
 • वर्तमान घडामोडीची माहिती हवी.
 • स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचे दिसणे महत्वाचे नसून, तुमचे असणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही पेपर मध्ये काय लिहिता? कस लिहिता? खूप महत्त्वाचे आहे.
 • एखाद्या गोष्टीवर किंवा विषयावर विचार करण्याची क्षमता पातळी कशी आहे हे महत्वाचे आहे.

अगदी अशाप्रकारे गुण जर विद्यार्थ्यां मध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांला नक्कीच घवघवीत यश मिळेल. ग्रामीण भागातील तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेला बसतात. परंतु पुस्तकांची किंमत ही जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना ती खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जर ही पुस्तके ग्रंथालयामध्ये किंवा कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिली तर प्रत्येक तरुणाचे पाय हे ग्रंथालयाच्या दिशेने वाटचाल करतील. आणि मग प्रत्येक तरुणाला वाचनाचे व्यसन लागल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्याने खूप कमी काळात स्वतःचे स्वप्न आणि यशाचे शिखर गाठलेल पाहायला मिळेल.

महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र पोलिस

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News