ही शस्त्रक्रिया अत्यल्प काळाची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

शरीरातील प्रत्येक भागानुसार की-होल शस्त्रक्रियेचे नावदेखील बदलत जाते.

शरीरातील प्रत्येक भागानुसार की-होल शस्त्रक्रियेचे नावदेखील बदलत जाते. पोटावरील शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपिक सर्जरी, छातीसाठी व्हीएटीएस (व्हिडिओ असिस्टेड थोरासीक सर्जरी), जोड शस्त्रक्रियेसाठी ऑथ्रोस्कोपिक सर्जरी, मेंदूसाठी एन्डोस्कोपीक ब्रेन सर्जरी आदी नावे आहेत. पारंपरिकरित्या केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना त्या जागेची चिरफाड अधिक होते. नंतर टाके घालून ती जखम भरून आल्यानंतर रुग्णाला चालणे-फिरण्यास अधिक वेळ लागतो.

पण, की-होल सर्जरीमुळे ही कटकट राहत नाही. अल्पसे छिद्र पाडून किंवा शरीरातील इतर छिद्रांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया यशस्वी केली जाते. त्यामुळे जखम भरून येण्याचा काळही अत्यल्प असतो. तसेच रुग्णही लवकर बरा होऊन घरी जाऊ शकतो. फायबर ऑप्टिक्‍स आणि व्हिडिओ टेक्‍नॉलॉजीमुळे छोट्या छिद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फायदेशीर आणि यशस्वी ठरल्या आहेत. ज्यामुळे रुग्णालयात अधिक काळ थांबणे, जखम लवकर भरून न येणे या गोष्टी टाळल्या गेल्या आहेत.

गायनोक्‍लोजिस्ट आणि गायनोक्‍लोजिस्ट आणि गॅस्ट्रोटेंस्टीनल सर्जन्सकडून प्रथम लॅप्रोस्कोपीक सर्जरीचा वापर होऊन त्याला प्रसिद्धी दिली. यूरॉलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टही लॅप्रोस्कोपीकचा वापर करून नैसर्गिक छिद्रांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करतात. ऑर्थोपेडिक सर्जन्सनी ऑर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रियांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. पूर्वीच्या शस्त्रक्रियांचा विचार करता की-होल सर्जरीत रुग्णांना लवकर बरे वाटून ते चालू फिरू शकतात.

सध्या मेंदू आणि स्पाइनवरही एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जात आहे. मस्तिष्क आणि हाडांवर मोठ्या जखमांऐवजी लहान छिद्र पाडून त्याद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया सर्व समस्या कमी करू लागली आहे. लॅप्रोस्कोपिकच्या सहाय्याने अपेंडिक्‍स काढणे, हर्निया, हार्ट, बर्न आदींवरील सर्व शस्त्रक्रिया करण्यात लेकव्ह्यूमधील तज्ज्ञ डॉक्‍टर्स पारंगत आहेत.

जाँडीस, पॅनक्रियेटीक समस्या, पित्तखडे, मुतखडे आदी सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार रुग्णालयात उपलब्ध आहेत. हैस्टरेक्‍टमी, इक्‍टोपिक प्रेगन्सीवर लॅप्रोस्कोपिकच्या सहाय्याने लेकव्ह्यूमधील गायनोक्‍लोजिस्ट उपचार करतात.

वैद्यकीय शस्त्रक्रियेच्या जगतात की-होल (लॅप्रोस्कोपिक) सर्जरी एक क्रांतिकारी पाऊल ठरले आहे. मॉडर्न सर्जरी म्हणून त्याकडे पाहिले जाते. मानवी छिद्रांच्या आधारे किंवा आवश्‍यक भागावर छिद्र पाडून त्याआधारे शस्त्रक्रिया करण्याची ही नवी पद्धत आहे. लेकव्ह्यू ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने की-होल लॅप्रोस्कोपिक सर्जरीची व्यवस्था करून उत्तर कर्नाटकात क्रांती घडविली आहे.
- डॉ. शशिकांत कुलगोड, 
संचालक, लेकव्ह्यू ग्रुप ऑफ हॉस्पिटल, बेळगाव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News