केनेथ ऍंथोनी यांनी पटकावला "पुणे श्री" चा 'किताब

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

या स्पर्धेत मिस्टर ऑलिंपिया झालेल्या रॉबी मोइरागथेमने शानदार प्रात्यक्षिके केली.

पुणे:  जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने द हिंदू फाउंडेशन आणि धनंजय विष्णू जाधव मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘पुणे श्री २०२०’ हा मान मसलअप जिमच्या केनेथ अँथोनीने पटकावला. लोकमान्यनगर, सदाशिव पेठ येथे झालेल्या या स्पर्धेत खासदार ‘गिरीश बापट श्री’ हा मान महाराणा जिमच्या तुषार चोरगेने, ‘द हिंदू श्री’ हा मान एम्पायर जिमच्या ऋषिकेश पासलकर, ‘मेन्स फिजिक श्री’ हा मान एमपी फिटनेसच्या महेश जावरेने; तर ‘बिकिनी फिटनेस श्री’ हा मान नाशिकच्या स्नेहा कोकणे पाटीलने मिळविला. याशिवाय ‘बेस्ट पोजर’ हा मान एसएनएन जिमच्या आबासाहेब वेटम; तर ‘मोस्ट इम्प्रूव्हड बॉडीबिल्डर’ हा मान पीएमसीच्या राहुल नानकने मिळविला.

या स्पर्धेत मिस्टर ऑलिंपिया झालेल्या रॉबी मोइरागथेमने शानदार प्रात्यक्षिके केली. या स्पर्धेत ५५ ते ८० किलोवरील वजनी गटात रियाज शेख, राजेश काळे, रूपेश चव्हाण, नवनाथ गावडे, शुभम वाईकर, तुषार चोरगे, केनेथ अँथोनीने मेन्स फिजिक गटात रामा गुरव व महेश जावरेने प्रथम स्थान मिळविले.  

या स्पर्धेचे उद्‌घाटन आणि बक्षीस समारंभप्रसंगी पुणे महानगरचे कार्यवाह महेश करपे, क्रीडा भारतीचे सरचिटणीस राज चौधरी, विजय पुरंदरे, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, इंद्राणी ग्रुपचे पुनीत बालन, महेश लडकत, शरद चव्हाण, अजय गोळे, धनंजय जाधव, राजेंद्र नांगरे, शंतनू खिलारे, अंकुश काकडे, सम्राट थोरात, ॲड. बिपीन पाटोळे, तेजेंद्र कोंढरे, संजयमामा देशमुख, विनायक जोशी, रघुनाथ गौडा, उदय लेले  उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News