केजरीवालचा केंद्र सरकारला स्पष्ट नकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • दिल्ली आरोग्य योजना दहापट चांगली
  • दुसरी योजना लागू करणे कोणाच्याच हिताचे ठरणार नाही

नवी दिल्ली - केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ योजना दिल्लीत लागू करण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या सरकारची ‘दिल्ली आरोग्य योजना’ या योजनेपेक्षा दहापटींनी व्यापक व लाभदायक ठरली असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
केजरीवालांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना भाजपने, ते व्यक्तिगत अहंकारापायी गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ करत असल्याचे म्हटले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्तर प्रदेश व हरियानातील रुग्णही दिल्लीत येतात. एक आरोग्य योजना चांगल्या पद्धतीने लागू होत असताना दुसरी योजना लागू करणे कोणाच्याच हिताचे ठरणार नाही. ‘आयुष्मान भारत’ दिल्लीत लागू करणार नाही. या योजनेच्या लाभार्थींना केवळ पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. मात्र दिल्ली सरकारच्या योजनेत उपचारांचा खर्च ३० लाख किंवा त्यापेक्षा कितीही जास्त झाला तरी तो सरकार उचलते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News