बिअर्ड शेव्ह ठेवणं ठरतंय तरुणाईमध्ये फॅशन स्टेटमेंट

सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Saturday, 5 October 2019
  • काही वर्षांपूर्वी असणारा क्‍लीन शेव्हचा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. त्याची जागा ‘बिअर्ड शेव्ह’ने घेतलीये. मात्र आता दाढी ठेवायची तर तिला मेंटेन करणंही आलंच. मग त्यासाठी वेगळी तेलं, शाम्पू आणि अगदी कंडिशनरही बाजारात आली आहेत.

पुणे: वाचून आर्श्‍चयच वाटेल, पण सध्या तरुणींप्रमाणेच तरुणही सलूनच्या वाऱ्या करत आहेत. त्याला कारण आहे ‘बिअर्ड शेव्ह’चा ट्रेंड... काही वर्षांपूर्वी असणारा क्‍लीन शेव्हचा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. त्याची जागा ‘बिअर्ड शेव्ह’ने घेतलीये. मात्र आता दाढी ठेवायची तर तिला मेंटेन करणंही आलंच. मग त्यासाठी वेगळी तेलं, शाम्पू आणि अगदी कंडिशनरही बाजारात आली आहेत. याशिवाय वेळोवेळी दाढीचं ट्रिमिंग, वॉशिंग हेही करावंच लागतं. ज्याचा महिन्याचा खर्च हजार रुपयांपासून सुरू होतो, जो अगदी ५ हजारांपर्यंत आहे.

काही वर्षांपूर्वी क्‍लीन शेव्ह ठेवणं हे सभ्यपणाचं लक्षण मानलं जात होतं. याउलट दाढी म्हणजे शॅबी लूक मानला जायचा. सिनेमातही केवळ खलनायकाची दाढी असायची. मात्र, हळूहळू सिनेमातील हा ट्रेंड बदलत गेला आणि विकी कौशल, आयुष्यमान खुराना यांच्या ‘बिअर्ड लूक’मुळे तरुणांमध्ये याची क्रेझ निर्माण झाली, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग सिनेमातील शाहीद कपूरच्या लूकमध्ये ‘बिअर्ड शेव्ह’ पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आलाय. एवढंच नाही तर टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू ‘बिअर्ड शेव्ह’मध्ये दिसून येतोय.

लग्नात बिअर्ड शेव्हचा लूक ठेवण्याकडेही तरुणांचा कल आहे. त्यामुळे अनेक तरुण लग्न ठरलं की लगेचच दाढी ठेवून ती मेंटेन करायला सुरवात करतात... त्यावर हजारो रुपये खर्चाचीही त्यांची तयारी असते.
- स्वप्नील थोरात, स्टायलिस्ट

बिअर्ड ठेवण्याची मला पहिल्यापासून आवड होती. मात्र, आता याचा ट्रेंड आल्याने माझ्यासारख्या मॉडेल्सला त्याचा फायदा होतोय. बिअर्डच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही मी सहभागी होत आहे. दाढी मेंटेन ठेवण्यासाठी खर्चही तितकाच असतो, पण हौसेला मोल नाही.
- सूरज, मॉडेल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News