ईमेल करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात; मिळेल सकारात्मक प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

ईमेलला योग्य फॉरम्याटमध्ये उत्तर दिल्यास अधिकाऱ्याचे समाधान होत व सकारात्मक प्रतिसाद मिळतो. इमेल कसा लिहावा या विषयी आम्ही माहिती सांगणार आहोत.  

मुंबई : इंटरनेटच्या जगात ईमेलला (इलेक्ट्रानिक मेल) महत्त्व प्राप्त झाले आहे. खासजी, शासकीय, व्यावसाईक आणि शिक्षण क्षेत्रात इमेलचा सर्सार वापर केला जातो. अधिकारी कार्यालयीन कामाची माहिती ईमेलद्वारे कर्माचाऱ्यांना दिली जाते, अशावेळी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे उत्तर द्यावे लागले. त्यासाठी इमेल लिहण्याचे कौशल्य आत्मसाद असले पाहिजे. ईमेलला योग्य फॉरम्याटमध्ये उत्तर दिल्यास अधिकाऱ्याचे समाधान होत व सकारात्मक प्रतिसाद मिळतो. इमेल कसा लिहावा या विषयी आम्ही माहिती सांगणार आहोत.  

असा लिहा मेल

ईमेल लिहण्यापुर्वी विषय आणि कोणाला पाठवायचा आहे याची सविस्तर माहिती असावी लागते. कार्यालयीन ईमेल पाठवायचा असेल तर प्रोफेशनलिज्म माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शब्द करना, स्पेलिंग बरोबर असावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करुन ईमेल लिहावा. ईमेलची सुरुवात अभिवादनाने करावी. उदा. नमस्कार, Respected sir, Good Morning. त्यांनतर इमेल स्वीकारणारी व्यक्ती परिचित असेल तर त्यांची विचारपूस करावी, अपरिचीत असेल तर त्यांचे नाव किंवा पद लिहून थेट विषयाला हात घालावा. त्यामुळे प्रोफेशनलिज्म बरोबरच व्यक्तीचे वर्तन समोरच्या अधिकाऱ्यांना जाणवते. ईमेलमध्ये शॉर्टकट माहिती न लिहता संक्षिप स्वरुपात लिहावी. मात्र ही माहिती जास्त लांबलचक नसावी. मु्ख्य माहिती लिहल्यानंतर शेवट हा गोड करावी. विनंती, आभार किंवा धन्यवाद मानावे. त्यातून कृतक्षता व्यक्त होते.  

योग्य फॉर्मेट

ईमेल लिहतांना एकसमान फॉन्ट असावा. साधारण डोळ्यांनी स्पष्ट दिसणारा स्पष्ट असा फॉन्ट वापरणे आवश्यक आहे. त्याबरोबर प्रोफेशनल फॉर्मेट वापरावा, इंटरनेटच्या माध्यमातून फॉर्मेटचे विविध प्रकार मिळतील त्यातला एक फॉर्मेट इमेलसाठी निवडावा. संपुर्ण इमेल लिहणे झाल्यानंतर पुन्हा एकदा सविस्तर, बारकाईने वाचून घ्यावे, त्यानंतर सेंड करावा. या सर्व गोष्टी ईमेल पाठवलांना सेंडरने लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे समोकच्या व्यक्तींवर झाप पडते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News