शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा - नागेश जायभाय यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

उरण : केवळ शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन त्यांचे विचार समाजात रुजणार नाहीत; तर स्वतःमध्येच शिवाजी महाराजांना पाहावे लागेल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा, असा सल्ला अहमदनगर येथील ॲड. नागेश जायभाय यांनी विद्यार्थ्यांना दिला. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी  आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते.

या वेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश म्हात्रे, डॉ. ए. यू. सरवदे, प्रा. यू. टी. घोरपडे; तसेच अन्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ॲड. नागेश जायभाय यांनी रयतेच्या राजाचा विजयी आणि प्रेरणादायी इतिहास आवेशपूर्ण भाषेतून उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच छत्रपतींचे चरित्र, चारित्र्य आणि पराक्रम अखंड देशाला आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करावयाचे असेल तर समग्र जनतेने त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोरख सांगळे म्हणाले की, देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले; मात्र ते कुणाच्याच लक्षात राहिले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शतकानुशतके माणसाच्या मनामनात, नसानसात घर करून आहे. त्यांचा पराक्रम न विसरता येणारा, न पुसणारा आहे. तेव्हा विद्यार्थ्यानी त्यांच्यातील वेगवेगळे गुण शोधून ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. तरच शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी झाली, असे म्हणता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News