काढ्याचं सेवन करताना हे लक्षात ठेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

काढ्याचं सेवन करताना हे लक्षात ठेवा

काढ्याचं सेवन करताना हे लक्षात ठेवा

महाराष्ट्र - आयुर्वेदिक उपचाराच्या अनुशंगाने विचार केल्यास, काढा हा प्रकार अतिशय उपयुक्त असा प्रकार आहे. काढा बनवण्यासाठी  हळद, आलं, ज्येष्ठमध, दालचिनी, काळीमिरी घटक प्रामुख्याने वापरले जातात. काढा हा कोणत्याही पदार्थांपासून तयार केला जातो. काढ्याचा परिणाम होण्यासाठी तो योग्य पध्दतीने बनवणं गरजेचा आहे.

अनेक आरोग्य तज्ज्ञांकडून काढा घेण्याचा सल्ला दिला जातो. बदलत्या ऋतूनुसार शरीराला काढा वेगळा द्यावा लागतो, हे अनेकांना माहित नाही. ऋतूनुसार शरीराला काढा दिल्यास अनेक फायदे होतात सल्ला नेहमी डॉक्टर लोकांना देतात.

काढा पिण्याचे फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
गरम काढा प्यायल्यानं चरबीचं प्रमाण घटतं.
काढ्यामुळे घशाचे विकार कमी होण्यास मदत मिळते

या आजाराच्या व्यक्तीनी काढ्याचे सेवन करू नये

५ वर्षाच्या आतील मुलांनी
मूत्राशयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी
अल्सरची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी
ब्लड पाइल्स असणाऱ्या व्यक्तींनी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News