अकराव्या सीझनमध्ये पुन्हा 'कौन बनेगा करोडपती'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Wednesday, 17 April 2019

विशेष म्हणजे हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीतही नेहमीच पुढे राहिला आहे. आता प्रेक्षकही ‘केबीसी ११’मध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत.

एकीकडे मराठीत पुन्हा ‘कोण होणार करोडपती?’ कार्यक्रमाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे हिंदीमधील ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनची घोषणा झाली आहे. ‘केबीसी’च्या अकराव्या सीझनचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला.

१ मेपासून मी तुम्हाला प्रश्‍न विचारण्यास पुन्हा सज्ज झालो आहे, असे या प्रोमोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन बोलताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष अमिताभ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीतही नेहमीच पुढे राहिला आहे. आता प्रेक्षकही ‘केबीसी ११’मध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News