कावनई; गिरीदुर्ग

प्रशांत शिंदे
Monday, 16 September 2019

इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे, पूर्वेकडे असणार्‍या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. यात कळसूबाई, अलंग, कुलंग, औंढा, पट्टा हे किल्ले येतात.तर पश्चिमेकडे असणार्‍या रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात. कावनई एक प्राचीन आणि दुर्लक्षित किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. नाशिक जवळील प्राचीन घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत होता. गडावर काही घरांचे अवशेष व देवीचे मंदिर आहे.

मंदिरात गावातीलच एक पुजारी नेमलेला आहे. मंदिरात एक अंदाजे 3 फुटाची प्राचीन तुतारी देखील आहे. कातळात खोदलेल्या पायर्या हेही गडाचे वैशिष्ट्य आहे. सुरतेच्या मोहिमेच्या वेळेस तेथील इतर किल्ल्यांसोबत हाही किल्ला स्वराज्यात आला असावा. पायथ्याशी पेशवेकालीन हनुमानाची मुर्ती एका मंदिरात आहे. येथील कामाक्षी मंदिरात सोने व चांदी चे मुकुट देवीला पेशव्यांनी चढवल्याचे गावकरी सांगतात.

किल्ल्याचा दरवाजा आजही बर्‍यापैकी शाबूत आहे. दरवाज्या पर्यंत पोचायला लोखंडी शिडी गावकऱ्यांनी लावलेली आहे. वर चढायचा पायऱ्या उध्वस्त केल्यामुळे ही लोखंडी शिडी लावली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हातालाच गुहा आहे. गुहेत ४ ते ५ जणांना राहता येते. येथूनच माथ्यावर जाण्यास जागा आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यावर दक्षिण भागात एक तलाव आहे. आजुबाजुला पडक्या वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. पण पावसात गवत वाढलेले असल्यामुळे ते अवशेष दृष्टीस पडत नाहीत.गडाच्या पश्चिम भागात एक बुरुज आहे.

हा बुरुज आजही 50% बऱ्यापैकी शाबूत आहे. बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा ते पाऊण तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो. पावसाळ्यात शिडीच्या अगोदर अंदाजे 100 मीटर चा रस्ता पावसात शेवाळ साचल्यामुळे स्लीपरी झाला आहे तर थोडे सांभाळून चढावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News