कतरिना कैफने केली १०० डान्सर्सची मदत; अकाऊंटमध्ये केले पैसे ट्रान्सफर  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • अभिनेत्री कतरिना कैफने कोरोना काळात बॉलिवूड डान्सर्सच्या मदतीसाठी हात पुढे केला केला आहे. कतरिनाने ही रक्कम डान्सर्सच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे.

अभिनेत्री कतरिना कैफने कोरोना काळात बॉलिवूड डान्सर्सच्या मदतीसाठी हात पुढे केला केला आहे. कतरिनाने ही रक्कम डान्सर्सच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे. हे सर्वश्रुत आहे की कोरोनाचा दुष्परिणाम फक्त सामान्य माणसांवरच नाही तर  अनेक बॉलीवूड कलाकारांवर झाला आहे तसेच डेली वेजर्सवर काम करणाऱ्या कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.जरी गेल्या काही दिवसांपासून शूटिंग सुरू झाली असली, तरी अद्याप लोकांना घर चालविण्यासाठी पुरेसे काम मिळाले नाही.

अशा परिस्थितीत इंडस्ट्रीमधील सर्व लोकांची सेवा करणे कठीण झाले आहे. दरम्यान, कतरिनाने 100 नर्तकांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्स्फर करण्यास मदत केली आहे, जेणेकरून त्यांना काही काम सुरू करुन उपजीविका भागवता येईल . असे सांगितले जात आहे की काही नर्तकांनी या  पैशांनी छोटा-मोठा व्यवसाय सुरु केला आहे, काहींनी रस्त्याच्या कडेला भाजीपाला, अंडी आणि स्नॅक्सची विक्री केली तर काहींनी टिफिन सेवा सुरू केली.

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारा राज सुराणी या कठीण काळात नर्तकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करीत आहे,त्यांनी  कॅटरिनाचे आभार मानले आहेत. "नर्तकांनी कॅटरिनाने ट्रान्स्फर केलेल्या पैशाचा उपयोग टिफिन सेवा, सौंदर्य सेवा आणि होममेड चॉकलेट्स विक्रीसाठी केला."

व्यावसायिक आघाडीविषयी बोलताना कॅटरिना कैफ सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना विषाणूमुळे निर्मात्यांनी त्याचे प्रकाशन पुढे ढकलले. देशातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. त्याचवेळी अक्षय आणि कतरिनाशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंग महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News