काश्‍मिरी युवक पुन्हा दहशतवादाकडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

काश्‍मीरमध्ये ऑपरेशन ऑलआउट मोहिमेला यश मिळत असले तरी, दहशतवादी संघटनेत युवकांचे भरती होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये ऑपरेशन ऑलआउट मोहिमेला यश मिळत असले तरी, दहशतवादी संघटनेत युवकांचे भरती होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यात काश्‍मीर खोऱ्यात विविध कारवायांत शंभर दहशतवादी मारले गेले आणि त्यात २३ परकी दहशतवाद्यांचा समावेश होता, तर दुसरीकडे पन्नासहून अधिक तरुण विविध दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे म्हटले आहे.

काश्‍मीर खोऱ्यात ३१ मेपर्यंत विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत आणि कारवाईत १०१ दहशतवादी ठार झाले. त्यात २३ परकीय दहशतवादी तर ७८ स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यात कमांडर झाकीर मुसाचा समावेश आहे. २३ मेच्या कारवाईत मुसा मारला गेला. दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया सक्रिय राहिल्याने याच भागात चकमकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यात शोपियाँ, पुलवामा, अवंतीपुरा भागाचा समावेश होतो.

त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाणही वाढले असून, जम्मू विभागातील पूँच आणि राजौरी जिल्ह्यातील सीमा आणि ताबारेषेवर दहशतवादी सक्रिय राहिल्याचे दिसून आले आहे. २०१४ पासून विविध दहशतवादी संघटनेत काश्‍मिरी युवकांचे भरती होण्याचे प्रमाण सतत वाढत चालले आहे २०१० ते २०१३ या काळात ५४,२३,२१ आणि ६ अशी संख्या होती. २०१४ मध्ये ही संख्या ५३ वर पोचली. त्यानंतर २०१५ मध्ये ५६ झाली. २०१६ मध्ये ८८ युवक दहशतवादी संघटनेत गेले. यासंदर्भात संसदेत आकडेवारी सादर करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जवानांना दगडफेक करणाऱ्या युवकांचा सामना करावा लागत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News