कार्तिक आर्यन कडून तब्बल ४० लाखांची भेटवस्तू 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 18 January 2020
  • कार्तिक आर्यांची आई मला आर्यन यांचा हा वाढदिवस हा चांगलाच लक्षात राहील
  • कारण आपल्या लाडक्या कार्तिक ने आपल्या मातोश्रींसाठी वाढदिवसाची भेट्वस्तूदेखील तितकीच अविस्मणीय अनुभव देऊन जाणारीच दिली आहे . 

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता आणि आपला सर्वांचा लाडका कार्तिक आर्यन हा सध्या सिनेवर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. कार्तिक आर्यांच्या आईचा नुकताच १६ जानेवारीला वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्तिक आर्यांची आई मला आर्यन यांचा हा वाढदिवस हा चांगलाच लक्षात राहील कारण आपल्या लाडक्या कार्तिक ने आपल्या मातोश्रींसाठी वाढदिवसाची भेट्वस्तूदेखील तितकीच अविस्मणीय अनुभव देऊन जाणारीच दिली आहे . कार्तिकने आपल्या आईला तब्बल ४० लाखांची गाडी भेट दिली आहे तीसुद्धा आलिशान अशी मिनी कूपर. त्यामुळे माया आर्यन ह्या सध्या चांगल्याच खूष असून 
आपल्या गाडीचा मनमुराद आनंद लुटताना दिसतायत.

आपला चिरंजीव कार्तिक आर्यन हा आपल्या गाडीचं सारथ्य करतोय हे पाहून माया आर्यन ह्या चांगल्याच खूष असल्याचं दिसून आल. नुकताच त्यांना वांद्रे येथील कार्टर रोडवर फेरफटका मारताना प्रसार माध्यमांनी पहिले. तसेच स्वतःचा आणि आईचा  फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आणि आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणींना देखील त्याने उजाळा दिला  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News