कार्तिक आर्यनची या दोन अभिनेत्रींसोबत लखनौ सफर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे ‘पती पत्नी और वो’ चित्रपटामध्ये झळकणार आहेत.
  • कार्तिक-आर्यनची लखनऊ सफर चित्रपटाला फायदेशीर ठरणार आहे. 

कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे ‘पती पत्नी और वो’ चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कार्तिक आणि भूमी लखनौला रवाना झाले असून, ते लखनऊमधील प्रेक्षणीय स्थळांवर या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होणार आहेत.

भूमी म्हणते, ‘कार्तिक जेव्हा कॅमेऱ्यासमोर असतो तेव्हा त्याचं काम पाहण्यासारखं असतं. मीही त्याच्यासारखीच उत्साही आहे. त्यामुळे आमची केमिस्ट्री उत्तम जुळून येईल.’ कार्तिकही भूमीबरोबर काम करणं एन्जॉय करत आहे. कार्तिक-आर्यनची लखनऊ सफर चित्रपटाला फायदेशीर ठरणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News