कार्तिकचा साधा-सरळ फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020

अभिनेता कार्तिक आर्यनने एकापाठोपाठ एक सरस चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मागील वर्षात तर त्याच्या चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर भरघोस कमाई केली. एक कलाकार म्हणून तर तो उत्तम आहेच, पण एक व्यक्ती म्हणून त्याच्यामधील साधेपणा त्याच्या चाहत्यांना अधिक भावतो.

याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे त्याच्याकडे महागड्या गाड्या असूनही कार्तिक रिक्षाने प्रवास करतो. नुकतंच कार्तिक एका निर्मात्याला भेटण्यासाठी रिक्षाने गेला आणि त्याचे रिक्षामधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

शिवाय आजही कार्तिक बाईकने फिरणं पसंत करतो. कितीही फेम, प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय जमिनीवरच असले पाहिजेत, हा कार्तिकचा साधा-सरळ फॉर्म्युला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News