ही आहे कर्नाळ्याची झलक...

प्रसाद शिंदे
Saturday, 31 August 2019

पनवेल : विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्या सारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेतो. कर्नाळ्या खालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे.

किल्ल्यांमध्ये असणार्‍या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये किल्ला घेतला. पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणार्‍या २३ किल्ल्या मध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता.

यानंतर सन १६७० नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला. त्यानंतर तो पेशव्यांकडे गेला. सन १८१८ मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News