अखेर करीना कपूरची इंस्टाग्रामवर दणक्यात एंट्री 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 6 March 2020
  • ती बऱ्याच दिवसांपासून इंस्टाग्रामवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगात होती. तिच्या चाहत्यांना तर तिच्या इंस्टाग्राम पदार्पणाविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती.

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर-खान ही सध्या चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. करीना कपूरच्या सोशल मीडियावरील पोस्ट या  तिच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या गोष्टींपैकी एक म्हणायला हव्यात.

सोशल मीडियावरील व्यक्त करणाऱ्या प्रत्येक भूमिकेबद्दल ती भलतीच पझेसिव्ह असते. तिच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या प्रत्येक फोटो हा तिच्या चाहत्यांसाठी प्रेमळ असा हळुवार कोपरा असतो असे म्हणायला हरकत नाही. ती बऱ्याच दिवसांपासून इंस्टाग्रामवर पदार्पण करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगात होती. तिच्या चाहत्यांना तर तिच्या इंस्टाग्राम पदार्पणाविषयी प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती.

अखेर करीना कपूरने इंस्टाग्रामवर दणक्यात एंट्री करून अल्पावधीतच ६ लाखांपेक्षा  जास्त फॉलोवर्स ने फॉलोव देखील केले. त्यामुळे करीना कपूर-कपूर खान ही सोशल मीडियामध्ये आणखी लाईमलाईटमध्ये आली आहे. करीना कपूरने इंस्टाग्रामवर पदार्पण करताच दोन पोस्ट शेअर केल्या.

एका पोस्टद्वारे तिने लवकरच डेब्यू करणार असल्याचे जाहीर देखील केले.तर दुसऱ्या पोस्टमध्ये  आकर्षक असा तिच्या मादक अदांनी  भरलेला फोटो देखील पोस्ट केला. यामुळे आपल्या सर्वांची लाडकी बेबो म्हणजेच करीना कपूर-खानची लोकप्रियता ही लग्नानंतरही अजून टीकून आहे यामध्ये मात्र शंका नाही      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News