करणची ड्रीम टीम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • दिग्दर्शक करण जौहरने याबाबत खुलासा केला
  • मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये
  • ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकबाबत विचारण्यात आले
  • ‘कुछ कुछ होता है’चा रिमेक बनवण्याचे पक्के झाले

मैत्रीची परफेक्‍ट व्याख्या सांगणारा चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. शाहरूख खान, काजोल, राणी मुखर्जी या त्रिकुटाने ‘कुछ कुछ होता है’च्या कथेत जान आणली.

बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या रिमेकची जोरदार चर्चा सुरू होती. आता दिग्दर्शक करण जौहरने याबाबत खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये करणला ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकबाबत विचारण्यात आले.

तेव्हा तो म्हणाला, ‘कुछ कुछ होता है’चा रिमेक बनवण्याचे पक्क झाले तर मी यासाठी रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरला कास्ट करेन.’ खरं तर बॉलीवूडमधील हे यंग कलाकार म्हणजे करणची ड्रीम टीम आहे. आता करण ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकची कधी घोषणा करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News