विराट कोहलीच्या सुमार कामगिरीवर कपिल देव यांची खरमरीत टीका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

त्याच्या या खराब कामगिरीचा फटका हा न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत देखील दिसून आला आहे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी असा कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवलेला विराट कोहली हा सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. ह्या ट्रोलिंगमागचे कारण म्हणजे त्याची दिवसेंदिवस खालावत चाललेली कामगिरी. विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत आहे.

त्याच्या या खराब कामगिरीचा फटका हा न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत देखील दिसून आला आहे. भारतीय क्रिकेट संघ हा कसोटी मालिकेबरोबर वन-डे सामन्यांमध्ये देखील सपशेल अपयशी ठरला.

या सर्व पराभवाचे खापर प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीवर फोडले या सर्व घडामोडींमागे संघाचा कर्णधार हा जवाबदार असल्याचा सूर उमटू लागला. या सर्व गोष्टींवर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी मात्र विराट कोहलीवर त्याच्या वयावरून प्रश्न उपस्थित केला तसेच त्याचे वाढते वय हे त्याच्या खराब कामगिरीमागचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट मत कपिल देव यांनी मांडले.

विराट कोहली हा खेळाडूने आपल्या वायची ३० वर्ष ओलांडली आहेत त्यामुळे त्याच्या वाढत्या वयाचा परिणाम हा त्याच्या कामगिरीवर होताना दिसून येत आहे.तसेच वाढत्या वयामुळे विराट कोहलीच्या दृष्टीमध्येदेखील फरक पडला असावा अशा आशयाचे परखड मत कपिल देव यांनी मांडले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News