video: कानडी पोलिसांची दादागिरी; मराठी आमदाराला केली धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना आज दुपारी 12.00 वाजता कर्नाटक पोलिसांनी अटक केली

बेळगाव: महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना आज दुपारी 12.00 वाजता कर्नाटक पोलिसांनी अटक केली. अटक करण्यापूर्वी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. 

 

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी येथील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी शुक्रवारी बेळगावात आले होते. 

महाराष्ट्रातील नेते अभिवादन कार्यक्रमाला येऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महामार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. पण त्यातूनही मंत्री पाटील बेळगावात पोचले व थेट हुतात्मा चौकात गेले. हुतात्मा चौकात अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडविले. पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करुन अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News