कंधारचा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 11 May 2020

इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला.

कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ २४ किलोमीटर इतके असून, चहू बांजूनी खंदक आहे. किल्ल्याचे बांधकाम मालखेडचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण यांने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणाऱ्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.

इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब आणि खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे.

हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजे इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा यांच्या काळातील अंदाजे इ.स. १५९० च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा आणि त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिध्द कारभाऱ्याने ही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या आणि बांधल्या.

मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान आणि घोरी खान यांनी तटाच्या भिंती खान आणि घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करून बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News