अतरंगी कंचन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 March 2020

अभिनेता कंचन पगारे मालिका, चित्रपट, जाहिरात यांसारख्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर आला. आता लवकरच त्याची वेगळी भूमिका असलेला  ‘ईमेल फिमेल’ हा चित्रपट येत आहे. यामध्ये तो सतत पार्टी करणाऱ्या विकी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यातून कंचनचा अतरंगीपणा प्रेक्षकांसमोर येणार आहे. याबाबत कंचन सांगतो, ‘बेफिकीर अशा विकीची भूमिका मी साकारत आहे.

या भूमिकेतून माझा वेगळा लूक आणि वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे. काहीतरी वेगळं करण्याची संधी मला या चित्रपटात मिळाली आहे.’ चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता निखिल रत्नपारखी, विजय पाटकर, सुनील गोडबोले, अभिनेत्री दीप्ती भागवत, प्राजक्ता शिंदे, प्रतीक्षा जाधवसारखे बरेच कलाकार आहेत. दिग्दर्शन योगेश जाधव यांचे असून निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांचे आहे. हा चित्रपट येत्या २० मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News