कामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय

यिनबझ
Friday, 16 October 2020

रितेशची ही अतिशय सुंदर व अत्यंत आकर्षक गाडी पुण्यातील शनिवार पेठ दक्षिण मुखी मारुती मंदिरा जवळ आहे. त्याचा रोजचा व्यवसाय ५०० ते ७०० रुपये इतका होत असल्याचे त्याने अभिमानाने सांगितले.

कामायनी संस्थेच्या विद्यार्थ्याने सुरू केला व्यवसाय

पुणेः कामायनी उद्योग केंद्र गोखलेनगर पुणे या कार्यशाळेत सध्या व्यवसाय प्रशिक्षण घेत असलेला, अत्यंत गुणी व अतिशय गरजू असलेला तसेच कामायनी क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला एक विद्यार्थी कुमार रितेश पंखेवला याने आताच्या कोरोना लॉक डाऊनच्या काळात स्वतःचा कच्ची दाबेलीचा व्यवसाय सुरू केला आहे.

रितेशची ही अतिशय सुंदर व अत्यंत आकर्षक गाडी पुण्यातील शनिवार पेठ दक्षिण मुखी मारुती मंदिरा जवळ आहे. त्याचा रोजचा व्यवसाय ५०० ते ७०० रुपये इतका होत असल्याचे त्याने अभिमानाने सांगितले.

रितेशचा हा उपक्रम खरेच अभिनंदनीय व सर्व पालकांना एक आदर्श देणारा असा असून संपूर्ण कामायनी परिवारास अत्यंत भूषणावह आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News